अॅड. चिमण डांगे अॅड. धैर्यशील पाटील खंडेराव जाधव, शहाजीबापू पाटील नगराध्यक्ष पदासाठी शहाजीबापू पाटील, खंडेराव जाधव, अॅड. चिमण डांगे,




नगराध्यक्ष पदासाठी शहाजीबापू पाटील, खंडेराव जाधव, अॅड. चिमण डांगे, अॅड. धैर्यशील पाटील यांची चर्चा
इस्लामपूर / हिंम्मत कुंभार : दिवंगत विजयभाऊ पाटील यांनी इस्लामपूर पालिकेवर 31 वर्षे सत्ता गाजवली होती. आगामी पालिका निवडणुकीत विजयभाऊ पाटील यांची उणीव राष्ट्रवादीसह विरोधकांना भासणार आहे. त्यांची उणीव भरून काढण्यासाठी आ. जयंत पाटील यांनी उरुण-इस्लामपूर पालिकेच्या निवडणूकीची जबाबदारी शहाजीबापू पाटील, खंडेराव जाधव, अॅड. धैर्यशील पाटील अॅड. चिमण डांगे, संजय कोरे यांच्यावर विभागून देण्याचा फंडा अवलंबल्याचे समजते. त्यामुळे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार यांच्यापैकी एक असणार असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
नगरपालिका निवडणूकीचे बिगुल काही महिन्यात वाजणार आहे. थेट नगराध्यक्ष, ओबीसी आरक्षण व प्रभाग रचनेचा निर्णय अद्यापही प्रलंबित आहे. राष्ट्रवादीसह विकास आघाडीतील इच्छुकांनी आपले प्रभाग निश्चित केले नाहीत. नगराध्यक्ष पदाची निवडणूक थेट जनतेतून होणार आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण खुले पुरुष पडले तर राष्ट्रवादीतून शहाजीबापू पाटील, अॅड. धैर्यशील पाटील, खंडेराव जाधव आणि ओबीसी आरक्षण पडल्यास संजय कोरे, अॅड. चिमणभाऊ डांगे यांच्या नावाची चर्चा आहे. विकास आघाडीतील नगराध्यक्ष पदासाठी विक्रमभाऊ पाटील, कपिल ओसवाल, वैभव पवार, आनंदराव पवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
पालिकेतील राष्ट्रवादी सत्तेच्या 30 वर्षांची कारकीर्द पाहता नगराध्यक्ष पद केवळ नामधारीच राहिले आहे. नगराध्यक्ष पदी कोणीही असला तरी त्याच्यावर फक्त सह्याजीराव हिच भूमिका साकारण्याची जबाबदारी असते. त्यांना दिवंगत विजयभाऊ पाटील यांचा आदेश घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेता आला नव्हता. दिवंगत विजयभाऊ पाटील यांना जो विरोध करेल अशा नगराध्यक्षांना सभागृहात काम करू न देण्याच्या कारवाया पाटील यांचा गट करत होता. याला अपवाद अॅड. चिमण डांगे यांनी आपला नगराध्यक्ष पदाचा कालावधी पूर्णपणे यशस्वी केला होता. या मागचे खरे रहस्य म्हणजे दिवंगत विजयभाऊ पाटील. विजयभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली चिमण डांगे यांनी आपली नगराध्यक्ष पदाची कारकीर्द यशस्वी झाली आहे. या दोन्ही भाऊंनी एकमेकांच्या विचाराने शहरातील राजकारण केले होते.
गत पालिका निवडणूकित राष्ट्रवादीला अंतर्गत गटबाजीचे ग्रहण लागल्याने विरोधकांच्या जास्त जागा निवडून आल्या. मात्र, आ जयंत पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत जो कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला आहे. तोच कानमंत्र नगरपालिका निवडणुकीत कार्यकर्त्यांना देणार आहेत. थेट नगराध्यक्ष पदासाठी इस्लामपूर शहर राष्ट्रवादीमध्ये खलबते सुरू आहेत. आरक्षण काय पडते, यावरच त्यांचा एकमेकांना पाठिंबा राहणार आहे. यदा-कदाचित नगराध्यक्ष पदासाठी खुले महिला आरक्षण पडल्यास या जागेवर सौ. अरुणादेवी पाटील यांना संधी मिळणार आहे. तसेच विकास आघाडीतील सौ. सुनीता भोसले-पाटील यांचे नाव निश्चित झाल्याची चर्चा सुरु आहे.
COMMENTS