राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड पुन्हा वादात सापडलेत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड पुन्हा वादात सापडलेत

आव्हाडांनी थिएटरमध्ये घुसून हरहर महादेवचा शो बंद पाडला

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड पुन्हा वादात सापडलेत. आव्हाडांनी कार्यकर्त्यांसह थिएटरमध्ये घुसून हरहर महादेवचा शो बंद पाडल्याचा प्रकार

गौतम स्कूलच्या हॉकी संघाचे दिल्लीकडे कूच
कोरोनाने दररोज होणार एक हजार मृत्यू ; आरोग्य विभागाचा इशारा; पुढील दोन आठवडे जास्त धोक्याचे
मुंबईत आजपासून 10 टक्के पाणी कपात

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड पुन्हा वादात सापडलेत. आव्हाडांनी कार्यकर्त्यांसह थिएटरमध्ये घुसून हरहर महादेवचा शो बंद पाडल्याचा प्रकार समोर आला आहे. ठाण्याच्या व्हिव्हियाना मॉलमध्ये जितेंद्र आव्हाडांचा कार्यकर्त्यांसह राडा घातला. कार्यकर्त्यांनी यावेळी एका प्रेक्षकालाही मारहाण केली आहे. या प्रेक्षकाला मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. शो बंद केल्यानंतर प्रेक्षकांनी तिकिटाचे पैसे मागितले म्हणून प्रेक्षकाला मारहाण झाल्याची माहिती मिळत आहे.हर हर महादेवचा शो सुरू असताना जितेंद्र आव्हाड अचानक थिएटरमध्ये आले आणि त्यांनी प्रेक्षकांना हा चित्रपट न बघण्याचं आवाहन केलं. ‘इतिहास बदनाम आणि विकृत करण्याची पुरंदरी परंपरा आहे. ब.म पुरंदरेंनी महाराष्ट्रात सुरू केलं ते आता सिनेसृष्टीच्या माध्यमातून महाराष्ट्रात पोहोचवण्याचं काम सुरू झालं आणि त्याला आमचा विरोध आहे. आम्हाला तुमच्याशी काहीही घेणं देणं नाही. पण असे विकृत सिनेमे महाराष्ट्रात दाखवायचे नाहीत हे आम्ही जाहिररित्या सांगतो’, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला.

COMMENTS