Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चांदवड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न

नामदार भुजबळांच्या मागे ताकद उभी करण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार

चांदवड प्रतिनिधी -  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चांदवड तालुक्यात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते असून ही साधे कार्यकर्तेच पक्षाबरोबर आहे लोकांचा विश्

समलिंगी जोडप्यांच्या समस्यांसाठी समिती
भाजपचे धक्कातंत्र !
कामगारांनी स्वत:च्या हितासाठी निर्णय घेण्याची घडी

चांदवड प्रतिनिधी –  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चांदवड तालुक्यात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते असून ही साधे कार्यकर्तेच पक्षाबरोबर आहे लोकांचा विश्वास आहे तेच लोक पक्षाबरोबर आहे नेते नसले तरी कार्यकर्त्यांचा मोठा संच आगामी काळात  पक्षाची ताकद उभी करणार आहे हे अभूतपूर्व असून अभूतपूर्व शब्दात अजित, भुजबळ ,तटकरे या नावांचा समावेश असल्याने दूरदृष्टी असलेल्या या नेत्यांच्या हाताखाली काम करण्याची मोठी संधी पक्षातील कार्यकर्त्यांना मिळणार आहे राष्ट्रवादीसाठी चांदवड  तालुक्याईतका  चांगला तालुका नाही एका दिवसात ५१ शाखा उघडण्याचा विक्रम याच चांदवड तालुक्याने केला आहे. तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत भुजबळ साहेबांच्या प्रयत्नामुळे रेणुका माता मंदिर चंद्रेश्वर मंदिराचा विकास झालेला आहे. तालुक्यातील शेती, पाणी व इतर सामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन  पक्षाचे जिल्हाप्रमुख एडवोकेट रवींद्रनाना पगार यांनी चांदवड येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांना केले आहे. यावेळेस प्रमुख उपस्थिती समता परिषदेचे दिलीपअण्णा खैरे यांची होती. सभेचे सूत्रसंचालन माजी सभापती यु. के. आहेर  यांनी केले यावेळेस अनिल काळे, रेवनभाऊ ठाकरे, सुनीलतात्या कबाडे ,आर.डी. थोरात , रघुनाथअण्णा आहेर,  डॉक्टर योगेश गोसावी, खंडेराव आहेर, महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रेरणाताई बलकवडे, डॉ. श्याम पगार आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चेतन कासव, माजी सभापती अनिल काळे, समता परिषदेचे जिल्हाअध्यक्ष डॉ.योगेश गोसावी, विविध सेलचे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. यशवंत शिरसाठ, राजेंद्र जाधव विजय पवार , किशोर पिंपळे ,बाकेराव जाधव, डॉक्टर अरुण निकम , रामभाऊ मोरे , महेश देशमाने आदी उपस्थित होते.  तसेच पदाधिकारी व युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS