Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफांचा पाय खोलात

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील पाच कर्मचार्‍यांना ईडीने घेतले ताब्यात

कोल्हापूर/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या समोरील अडचणी वाढतांना दिसून येत असून, गेल्या दोन दिवसांपासून अंमलबजावणी संच

नाशिकच्या विभागीय आयुक्तपदी डॉ. प्रवीण गेडाम
आयपीएस देवेन भारतीविरोधात गुन्हा दाखल | LOKNews24
संगमनेरात पोलिस प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर

कोल्हापूर/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या समोरील अडचणी वाढतांना दिसून येत असून, गेल्या दोन दिवसांपासून अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर छापे टाकत चौकशी सुरु केली असतांनाच, गुरुवारी ईडीने बँकेतील 5 कर्मचार्‍यांना ताब्यात घेतले आहे.

ईडीने पाच कर्मचार्‍यांना ताब्यात घेताना बँकेतून चार बॉक्स भरून कागदपत्रेही नेली आहेत. ईडीने पाच जणांना ताब्यात घेतल्यानंतर बँकेचे इतर कर्मचारी संतप्त झाले आहेत.  तर बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पाच जणांना ईडीने ताब्यात घेतले. यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अशोक माने, आर जे पाटील, व्यवस्थापक साखर कारखाना, अल्ताफ मुजावर उप व्यवस्थापक (साखर कारखाना कर्ज वाटप विभाग), सचिन डोंडकर, निरीक्षक (साखर कारखाना कर्ज वाटप विभाग) यांचा समावेश आहे.आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर झालेल्या कथित आरोपांममध्ये ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुश्रीफ आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी 15 वर्षांपूर्वी बंद झालेल्या कंपनीच्या खात्यात 50 कोटी कॅश भरले होते. ते पैसे साखर कारखान्याच्या खात्यात वळवले होते. तसेच कोलकात्यातील काही शेल कंपन्यांचा वापर करुन काळा पैसा आपल्या खात्यात वळल्याचा आरोप ईडीने केला आहे. या प्रकरणाची मागील सहा महिन्यांपासून आम्ही चौकशी करत होतो अशी माहिती ईडीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली होती. काही कंपन्यांची चौकशी ईडी करत आहे. त्या कंपन्यांचे कनेक्शन हसन मुश्रीफ आणि त्यांच्या संबंधित असलेल्या साखर कारखान्यांशी जोडलं जात आहे. रजत प्रायव्हेट लिमिटेड, माऊंट कॅपिटल लिमिटेड या दोन्ही कंपन्या बंद पडल्या आहेत.

COMMENTS