मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना आज, सोमवारी मुंबईच्या पीएमएलए न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.त्यामुळं मलिक
मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना आज, सोमवारी मुंबईच्या पीएमएलए न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
त्यामुळं मलिकांची रवानगी आता ऑर्थर रोड तुरुंगात होणार आहे.अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी ईडीने अटक केली होती. त्यानंतर त्यांना कोर्टाने 13 दिवसांची ईडीची कोठडी सुनावली होती. मलिक यांची ही कोठडी 7 मार्च रोजी संपत असल्याने त्यांना पुन्हा मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीने काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. ईडीच्या रडारवर डॉन दाऊद इब्राहीमची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी ईडीच्या रडारवर होते.
COMMENTS