अहमदनगर/प्रतिनिधी : भारतीय नौदलात आय. एन. एस. चिल्का, ओरिसा येथे हजर होण्याबाबत नियुक्ती पत्र त्यांना मिळाले, त्याची खात्री करण्यासाठी त्यांनी ते नेव
अहमदनगर/प्रतिनिधी : भारतीय नौदलात आय. एन. एस. चिल्का, ओरिसा येथे हजर होण्याबाबत नियुक्ती पत्र त्यांना मिळाले, त्याची खात्री करण्यासाठी त्यांनी ते नेव्हीच्या मुंबई येथील कार्यालयात दाखवले असता ते नियुक्ती पत्र खोटे असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसात धाव घेतली व नगर तालुका पोलिसांनी गणेश बाबासाहेब घुगे (रा. कल्याण पश्चिम, मुंबई) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
भारतीय नौदलात (नेव्ही) नोकरीला लावून देतो, असे म्हणत तरुणाकडून दीड लाख रुपये उकळले व भरतीचे खोटे नियुक्त पत्र देऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अंकुश भाऊसाहेब टकले (वय 32, रा. भोयरे पठार, ता. नगर) यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गणेश घुगे याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला व त्याला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. अंकुश टकले व गणेश घुगे यांची मुंबईमध्ये ओळख झाली होती. मी भारतीय नौदलात नोकरीला असल्याचे घुगे याने टकले यांना सांगितले होते. टकले यांनी घुगे यांच्याकडे नेव्ही भरतीसाठी विचारणा केली. तेव्हा घुगे म्हणाला, ‘माझी नेव्हीमध्ये खूप ओळख आहे. भरतीसाठी साडेपाच लाख रुपये द्यावे लागतील. सुरुवातीला दोन लाख व नियुक्ती झाल्यानंतर बाकीचे पैसे द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानुसार टकले यांनी 13 फेब्रुवारी 2021 रोजी एक लाख आणि 15 फेब्रुवारी 2021 रोजी 50 हजार रुपये घुगे याला फोन-पे केले. 29 ऑक्टोबर 2021 रोजी टकले यांच्या ई-मेलवर नियुक्त होऊन हजर होण्यासंदर्भात एक पत्र आले होते. 2 डिसेंबर 2021 रोजी भारतीय नौदलात आय. एन. एस. चिल्का, ओरिसा येथे हजर होण्याबाबत त्यामध्ये नमूद केले होते. टकले यांनी याबाबत नेव्हीच्या मुंबई येथील कार्यालयात या नियुक्त पत्राबाबत खात्री केली असता ते नियुक्ती पत्र खोटे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच टकले यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
COMMENTS