अमरावती : गेल्या अनेक दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा चालू होता. आता मात्र हा तिढा अखेर सुटला असून भाजपने येथे आपल्या
अमरावती : गेल्या अनेक दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा चालू होता. आता मात्र हा तिढा अखेर सुटला असून भाजपने येथे आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. येथील विद्यमान खासदार नवनीत राणा यांनी रात्री उशिरा भाजपत जाहीर प्रवेश केला असून भाजपने त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपने अमरावतीमध्ये खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आहे. त्या अमरावतीच्या विद्यामान खासदार आहेत. महायुतीकडून उमेदवारी मिळावी यासाठी त्या गेल्या कित्येक दिवसांपासून प्रयत्न करत होत्या. त्यांच्याविरोधात चालू असलेल्या जात वैधता प्रमाणपत्रा विषयीच्या खटल्यामुळे भाजपनेही त्यांना उमेदवारी देण्याविषयी साधवगिरीची भूमिका बाळगली होती. आता मात्र महायुतीचा या जागेवरचा उमेदवार ठरला असून येथून नवनीत राणा याच महायुतीच्या उमेदवार असतील. राणा यांनी 27 मार्च रोजी भाजपत जाहीर प्रवेश केला. त्यानंतर भाजपने त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे. म्हणजेच राणा या आता कमळ या निवडणूक चिन्हावरच ही निवडणूक लढवणार आहेत.
COMMENTS