Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवी मुंबई महानगरपालिकेने ओलांडले 800 कोटी करवसूलीचे उद्दिष्ट

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेकडे मालमत्ताकर, पाणीपट्टी, बांधकाम परवानगी प्रस्ताव, परवाना शुल्क अशा विविध बाबींमधून जमा होणार्‍या महसूलातूनच

राहुरी शहरात शांतता राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे : पालकमंत्री विखे
यवतमाळ जिल्ह्यात कॅल्शियम सिरपमध्ये ‘फॉरेन पार्टीकल’ आढळल्याप्रकरणी चौकशी करून कारवाई: मंत्री प्रकाश आबिटकर
गणेश मुद्दमेने साकारली पुरंदर किल्ल्याची प्रतिकृती

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेकडे मालमत्ताकर, पाणीपट्टी, बांधकाम परवानगी प्रस्ताव, परवाना शुल्क अशा विविध बाबींमधून जमा होणार्‍या महसूलातूनच नागरी सेवासुविधांची परिपूर्ती केली जात असते. याकरिता सुजाण नवी मुंबईकर नागरिकांनी सहकार्य केल्यामुळे करवसूलीची बहुतांशी प्रमाणात उद्दीष्टपूर्ती झाली असून त्याबद्दल महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नवी मुंबईकर नागरिकांचे आभार व्यक्त केले आहेत.
यामध्ये मालमत्ता कर विभागाने 826.12 कोटी इतका मालमत्ता कर जमा केला असून त्यामध्ये अभय योजनेव्दारे थकीत मालमत्ताकरावरील शास्ती रकमेवर 50 टक्क्यांच्या सूटीचा लाभ घेत 20.97 कोटी इतकी रक्कम जमा झालेली आहेव तितक्याच रक्कमेची सवलत थकबाकीदारांना झाले आहे. त्याचप्रमाणे पाणीपुरवठा विभागामार्फत 105.93 कोटी इतकी रक्कम जल देयकांमार्फत जमा झालेली आहे. पाणी पुरवठा विभागामार्फत देण्यात आलेल्या अभय योजनेचा लाभही नागरिकांनी मोठया प्रमाणावर घेतला.

COMMENTS