नवी मुंबईतील परिसरात महिला डॉक्टर आहे, असे सांगून महिलेच्या आवाजात ज्वेलर्सला सोन्याचे दागिने बनवायचे असल्याचा बनाव करून तसेच मेडिकल स्टोअर येथे डॉक्
नवी मुंबईतील परिसरात महिला डॉक्टर आहे, असे सांगून महिलेच्या आवाजात ज्वेलर्सला सोन्याचे दागिने बनवायचे असल्याचा बनाव करून तसेच मेडिकल स्टोअर येथे डॉक्टर असल्याचा बनाव करून मेडिकल मधील प्रॉडक्ट रुग्णालयात पाठवा. असे खोटं सांगत बांगड्याचे माप व ऍडव्हान्स घेण्यासाठी घरी बोलावून आपल्याकडे 2000 रुपयांच्या नोटा असून सुट्ट्या पैशाची गरज असल्याचे सांगत 500 रुपायांच्या नोटा आणण्यास सांगून आणलेले पैसे घेऊन फसवणूक करणाऱ्या भामट्यांना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली . नवी मुंबई पोलिसांनी अतिशय शिताफीने आरोपी मनीष आंबेकर व अँथॉनी जंगली या दोघा आरोपींना अटक केलीय. या आरोपींवर नवी मुंबई सह मुंबई ठाणे रायगड पुणे या जिल्ह्यात देखील तब्बल 20 पेक्षा अधिक फसवणुकीचे गुन्हे नोंद आहेत. अधिक तपास करत नवी मुंबई पोलिसांनी रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली कार असे एकूण 5लाख 1हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.
COMMENTS