Homeताज्या बातम्याशहरं

मणदुरच्या काऊदर्‍यावर जानाई-मल्हारच्या साक्षीने निसर्गपूजा उत्साहात

पाटण : निसर्ग पूजा करताना नागरिक. (छाया : विजयकुमार हरिश्‍चंद्रे, जेजूरी) पाटण / प्रतिनिधी : राज्यात उत्तम पर्जन्य वृष्टी आणि निसर्गवृध्दी करिता प

किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना सुरू होणार नाही : सहकारमंत्री
ऊसदर आंदोलनाच्या गुन्ह्यातून राजू शेट्टीसह सर्वजण निर्दोष
महायुती सरकारकडून सोयाबीनला सहा हजार रूपये हमीभावासह ओलाव्याची मर्यादेत तीन टक्क्यांनी वाढ

पाटण / प्रतिनिधी : राज्यात उत्तम पर्जन्य वृष्टी आणि निसर्गवृध्दी करिता पाटण तालुक्यातील मणदुरच्या काऊदर्‍यावर जानाई-मल्हाराच्या साक्षीने निवकणे जानाई देवीच्या यात्रेसाठी खंडोबाच्या जेजुरीवरुन पायी चालत आलेल्या हाजारो भाविक भक्तांनी झाड फळांच्या बीजांसह गुलाल-भंडार्‍याची उधळण करीत गुरवारी सकाळी निसर्गपूजा साजरी केली.
शेकडो वर्षांची परंपरा असलेली जयाद्री ते सह्याद्री हि जेजुरी ते निवकने, ता. पाटण, जानाईदेवी पायी पदयात्रा यंदाही उत्सहात पार पडली. या सोहळ्यात समुद्र सपाटीपासून तेराशेमीटर उंच अशा सह्याद्री डोंगर माथ्यावरील मणदुरे काऊदरा येथे शेकडो जानाईभक्तांनी आणि निसर्गप्रेमीनी राज्यात उत्तम पर्जन्य वृष्टी आणि निसर्ग वृध्दी करिता नारळ फोडून भंडारा व झाड फळ बीजांची उधळण करत केली वसुंधरा जानाईदेवीची प्रार्थना. या उत्सवाचा प्रारंभ जेजुरीतून सुरु होतो. यावेळी संपूर्ण जेजुरी गाव आपल्या जानाईदेवी निसर्ग यात्रेच्या प्रस्थान सोहळ्याला निरोप देण्यास एकत्र येत असतो. बैलगाड्यांचा ताफा असा लवाजमा असतो. या संपूर्ण सोहळ्यात जानाईदेवी अन्नदान ट्रस्टच्या वतीने मोफत अन्नदान केले जाते. यंदाचे त्यांचे 24 वे वर्ष असून संपूर्ण पदयात्रेत ट्रस्टमार्फत चोख व्यवस्थापन केले जाते. जेजूरी मार्तंड देवस्थान आणि जेजुरी मेडिकल असोशियन यांच्या मार्फत विशेष सहकार्य केले जाते.
संत नागू माळी यांनी या पायी पदयात्रेची सुरवात शेकडो वर्षापूर्वीपासून सुरु केली आहे. आजही त्यांचे वंशज नागेश झगडे व परिवार हि परंपरा टिकवून आहेत. नुकत्याच दहावर्षात सुरु झालेल्या निसर्गपूजा उत्सवातून आध्यत्मिक आणि निसर्गाचे दर्शनही घडते. यात उंच डोंगराहून भंडारा व फळेवृक्षांच्या बियांची उधळण करून प्रार्थनाही केली जाते. येथील डोंग्वासी महिलेना देवी मानून वृक्ष व वस्त्रदान केले जाते. यावेळी निसर्ग गाणी गात महिलाही सहभागी होतात. या निसर्गपूजे करिता पाटण पत्रकार संघ व जेजुरी पत्रकार संघ विशेष परिश्रम घेत असतात. जानाईदेवी अन्नदान सेवा ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र बारभाई, अध्यक्ष शिवाजी कुतवळ, बाळकृष्ण बारभाई, शब्बीर तांबुळी, रत्नाकर मोरे, रवींद्र बारभाई, सामाजिक कार्यकर्ते विजय झगडे, माउली खोमणे, औदुंबर शिंदे, गणेश आगलावे यांनी विशेष परिश्रम घेतले. निश्‍चितच राज्यातील विविध उत्सवातून धार्मिक आणि निसर्ग संस्कृतीचे जतन करणार्‍या अशा निसर्ग पूजा सर्वत्र साजर्‍या झाल्यास संपूर्ण जग वृक्षवल्लीने हरित होईल यात शंका नाही, असे मत निसर्गप्रेमी विजयकुमार हरिश्‍चंद्रे यांनी व्यक्त केले.

COMMENTS