Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देशमुख महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिन उत्साहात

अकोले ःअकोले तालुक्यातील राजूर येथील अ‍ॅड.एम.एन.देशमुख कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन क

देशमुख महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर कार्यशाळा उत्साहात
देशमुख महाविद्यालयात वाड्.मय मंडळाचे उद्घाटन
देशमुख महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

अकोले ःअकोले तालुक्यातील राजूर येथील अ‍ॅड.एम.एन.देशमुख कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा गांधी यांनी खेड्याकडे चला हा संदेश सर्व भारतीयांना दिला होता. हा संदेश राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक प्रत्यक्षात उतरवतीलच. पर्यावरण संरक्षण, श्रमनिष्ठा हे विद्यार्थ्यांचा स्थायी भाव आहे. आपल्या शक्तीचा उपयोग विधायक कामासाठी उपयोगात आणावा असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अकोले महाविद्यालयाचे प्रा. डॉ. सुनिल मोहटे यांनी केले. ते अ‍ॅड. एम. एन. देशमुख महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वर्धापन दिनानिमित्त बोलत होते.
राष्ट्रीय कार्यात युवकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होतो.असेही ते म्हणाले. तर आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. बी.वाय.देशमुख यांनी समाजाचे आपण काही तरी देणे लागतो.कोणत्याही समाजकार्यात विद्यार्थ्यांनी हिरीरीने भाग घेतला तर सांघिक भावना, नेतृत्व गुण, विकास, शारीरिक कार्यक्षमता या गुणांचा विकास राष्ट्रीय सेवा योजनाच करू शकते असे ते म्हणाले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.बी.के.थोरात यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.डॉ.एल.बी काकडे यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी प्रा.डॉ.डी.बी.तांबे, प्रा.डॉ.पी.टी.करंडे, विद्यार्थी मंडळाचे चेअरमन प्रा.के.जे.काकडे, विद्यार्थी विकास मंडळाचे प्रमुख प्रा.डॉ.व्ही.एन.गिते, प्रा.यू.डी.अवसरकर, प्रा.आवारी तसेच शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमासाठी 164 स्वयंसेवक उपस्थितीत होते.

COMMENTS