Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

30 मीटर जागा असेल तरच राष्ट्रीय मार्गाला मंजुरी मिळते मग आता कुठे घोडे अडले-आ.प्रदीप नाईक

अखेर पावसाळा आला तरी भिजत घोंगडेच, नागरिकांची हालअपेष्टा.

किनवट प्रतिनिधी - राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी देताना जर 30 मीटर रोड साठी जागा उपलब्ध असेल तरच मंजुरी मिळते, मग आता तुमचा मनमानी कारभार कसा ? आपल

सरकारचे मंत्रालय बंद, दुकानदारी सुरू : पंकजा मुंडे
129 गावांतील साडेआठ हजारावर शेतकर्‍यांचे गारपिटीत नुकसान
Sangamner : संगमनेरमध्ये मुसळधार पाऊस| LokNews24

किनवट प्रतिनिधी – राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी देताना जर 30 मीटर रोड साठी जागा उपलब्ध असेल तरच मंजुरी मिळते, मग आता तुमचा मनमानी कारभार कसा ? आपल्याच मर्जीने कुठे 60 मीटर तर कुठे 80 मीटर तर कुठे 100 मीटर असे का? आता कुठे तुमचे घोडे अडत आहेत? असा गंभीर प्रश्न किनवट माहूर विधानसभेतील राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा माजी आ.प्रदीप नाईक यांनी गुत्तेदार व संबंधित प्रशासनाला विचारला आहे. त्वरित जो राष्ट्रीय महामार्गाचा नियम आहे त्याच नियमात राष्ट्रीय मार्ग त्वरित पूर्ण करा. अशा आशयाचे पत्र पुन्हा प्रदीप नाईकांनी प्रशासनाला दिल्यामुळे पुन्हा शहर विकास प्रेमी मध्ये उत्साह वाढला आहे.
 राष्ट्रवादी पक्षाचे नेते तथा माजी आमदार प्रदीप नाईक यांनी वेळोवेळी, अनेकदा राष्ट्रीय महामार्गाच्या गलथान व भ्रष्ट कामासंदर्भात आवाज उठवला होता आणि उठवीतही आहेत. परिणामी गेंड्याची कातडी चढलेल्या प्रशासनाला आणि गुत्तेदारांना काही घाम फुटत नाही. याबद्दल कमालीचे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 30 मीटर राष्ट्रीय महामार्गाचा रोड असेल तरच गोकुंदा गेट वर उड्डाणपूल होईल अन्यथा नाही. यापासूनही आपण मुक्तो की काय ? अशी शंका वर्तवली जात आहे. संबंधित गुत्तेदार आपल्याच मनमानीने काम करत आहेत. त्यांना कुणाचा तरी छुपा आशीर्वाद आहे. अशीही शंका  वाटत आहे. परत पावसाळा आला,आता वाटसरू आणि प्रवाशांची गतवर्षाप्रमाणे तीच फजिती होणार, पुलाचे काम आजही अर्धवटच, पूर्ण रोडही झाला नाही तरी चिखली जवळील रस्ता उखडून जात आहे. हा कसा राष्ट्रीय महामार्ग ? आमच्या परिसरातील भोळ्या जनतेचा फायदा ही संबंधित यंत्रणा घेत आहे. हे कुठे पाप फेडसाल ? तुम्हाला जनता माफ करणार नाही. गत सहा वर्षांपासून सदर काम मनमानीने आणि संत गतीने चालू आहे. तेही निकृष्ट, मी अनेक वेळा या संदर्भात जिल्हाधिकारी आणि विकोझोन संदर्भात चा मुद्दा संबंधित असलेले वनविभागाच्या मुख्य वनसंरक्षक व संबंधित प्रशासनाकडे लेखी व तोंडीही समस्या मांडून मार्ग मोकळा केला होता. तरीही राष्ट्रीय महामार्गाचे भिजत घोंगडे कायमच, अशी खंत नाईकांनी मांडली. आता शेवटी 30 मीटर रुंदी साठी अडसर येत असलेल्या ठिकाणचे काम सोडून संबंधित गुत्तेदार पळून जातील, त्यांचा आता काही विश्वास नाही.त्यासाठी मी आपल्या सोबत खंबीर आहे. राष्ट्रीय महामार्गाचे पूर्ण काम होईपर्यंत गप्प बसणार नाही. असाही विश्वास मा आ.नाई कांनी दिल्यामुळे विकास प्रेमी नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

COMMENTS