Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फलटणला होणारे राष्ट्रीय सामने यशस्वी पार पडतील : श्रीमंत रामराजे

फलटण / प्रतिनिधी : आज फलटणच्या माझ्या भुमिमध्ये खो-खो खेळाला जात आहे. दहा दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणावर पाऊस होता. त्यामुळे स्पर्धावर जरा पावसाचे

कार्याला ’माणुसकी’चे श्राध्द; तांबवेच्या पाटील कुटुंबाने दिले मुलांना शैक्षणिक साहित्य
एसटीच्या कर्मचार्‍यांच्या संपाला गालबोट; सुर्ली घाटात आटपाडी-कराड बसवर दगडफेक
रणजितसिंह देशमुख यांची भारत जोडो यात्रा जिल्हा समन्वयक म्हणून नियुक्ती

फलटण / प्रतिनिधी : आज फलटणच्या माझ्या भुमिमध्ये खो-खो खेळाला जात आहे. दहा दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणावर पाऊस होता. त्यामुळे स्पर्धावर जरा पावसाचे सावट होते. त्यावेळी माझ्यासह श्रीमंत संजीवराजे यांना स्पर्धा कशा होतील याबाबत साशंकता होती. परंतू पावसाने विश्रांती दिल्याने फलटणला होणार्‍या खो-खो स्पर्धा यशस्वी होतील, असा विश्‍वास विधान परिषदेचे माजी सभापती व आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.
फलटण येथील माजी आमदार स्व. श्रीमंत विजयसिंहराजे उर्फ शिवाजीराजे नाईक निंबाळकर क्रीडांगणावर राष्ट्रीय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या उद्घाटन समारंभात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी आ. शशिकांत शिंदे, आ. अनिकेत तटकरे, महाराष्ट्र खो-खो असोसिशनचे उपाध्यक्ष व आ. अभिमन्यू पवार, आ. दीपक चव्हाण, महाराष्ट्र खो – खो असोसिशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, भारतीय खो-खो महासंघाचे अध्यक्ष सुधांशू मित्तल, भारतीय खो खो महासंघाचे महासचिव महेंद्रसिंग त्यागी, भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव चंद्रजित जाधव, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुभाष शिंदे, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष महेश गादेकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष विजयराव मोरे, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस गोविंद शर्मा, महाराष्ट्र खो-खो असोसिशनचे कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, भारतीय खो-खो संघाच्या कर्णधार सुप्रिया गाढवे, फलटणचे तहसीलदार समीर यादव, फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड व सातारा जिल्हा खो-खो असोसिएनचे सर्व पदाधिकारी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
फलटणला स्वतःचा व खो-खोचा असा इतिहास आहे. महाराष्ट्रामध्ये खो-खो सह सर्वच खेळांना प्रोत्साहन करण्यासाठी यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांच्यासह मान्यवरांनी काम केले आहे. श्रीमंत संजीवराजे यांच्या नेतत्वाखाली राज्यात खो-खो मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देशात खेलो इंडियाची वाढ मोठ्या प्रमाणात सर्वच तालुक्यात आहे. धाराशिव येथे होणार्‍या पुढील राष्ट्रीय खो-खो सामन्यासाठी सर्वांना येथूनच मी निमंत्रण देत आहे, असे मत महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष व औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केले.

COMMENTS