नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली, चंदीगड, पंजाब, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये 70 ठिक

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली, चंदीगड, पंजाब, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये 70 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले. गँगस्टर टेरर फंडिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. गुंड आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या अड्ड्यावर हे छापे टाकले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएचा हा छापा लॉरेन्स बिश्नोईसारख्या गुंडांवर आणि त्याच्या सर्व राज्यांतील निकटवर्तींवर टाकला जात आहे. यापूर्वी गेल्या वर्षाच्या अखेरीस दिल्ली-एनसीआरसह देशातील अनेक राज्यांमध्ये एकाच वेळी छापे टाकण्यात आले होते. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई, नीरज बवाना, टिल्लू ताजपुरिया आणि गोल्डी ब्रार आधीच एनआयएच्या रडारवर आहेत. याप्रकरणी एनआयएने अनेक गुंडांची चौकशीही केली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दहशतवादविरोधी एजन्सी एनआयएने उत्तर भारत आणि दिल्लीतील 50 हून अधिक ठिकाणी छापे टाकले होते. यानंतर एनआयएने एक गुंड आणि वकिलालाही अटक केली होती.
COMMENTS