Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

थोरात महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कार्यशाळा उत्साहात

शैक्षणिक दर्जा उत्तम होण्यासाठी नवीन धोरण गरजेचे ः डॉ. मिठारे

संगमनेर ः समाजाच्या विकासासाठी शिक्षण क्षेत्र हे अत्यंत महत्त्वाचे असून आधुनिक काळा बरोबर शिक्षण व्यवस्था ही बदलली पाहिजे कौशल्यपूर्ण शिक्षण आणि

आंदोलनाचा इशारा देताच वीजपुरवठा सुरळीत
जी-20 चे प्रतिनिधित्व भारताच्या विकासाला बळकटी देणारे – प्रा. डॉ. हर्षा गोयल
डोक्यात दांडा मारून एकाचा खून

संगमनेर ः समाजाच्या विकासासाठी शिक्षण क्षेत्र हे अत्यंत महत्त्वाचे असून आधुनिक काळा बरोबर शिक्षण व्यवस्था ही बदलली पाहिजे कौशल्यपूर्ण शिक्षण आणि उत्तम शैक्षणिक दर्जा होण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण गरजेचे असल्याचे प्रतिपादन पुणे विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. यशोधन मिठारे यांनी केले असून थोरात महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 कार्यशाळा संपन्न झाली यावेळी यशोधन मिठारे बोलत होते अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड हे होते. तर व्यासपीठावर प्राचार्य डॉ दिनानाथ पाटील प्रा. टी एस जाधव, प्राध्यापक विजय बैरागी, प्राचार्य डॉ सुहास निंबाळकर, प्राचार्य डॉ गोरक्षनाथ कल्हापुरे, डॉ मंगेश वाघमारे ,डॉ विजय गुरसळ, मनोहर सानप, डॉ भाऊसाहेब रणपिसे, डॉ. किशोर निकम, डॉ. रवींद्र जाधव, डॉ सचिन घोलप डॉ सय्यद, डॉ.कोकाटे, डॉ. विलास कोल्हे, नेट समन्वयक डॉ. घायवट, डॉ.दत्ता पवार, डॉ गुंफा डॉ सुहास निंबाळकर आधी उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ मिठारे म्हणाले की नवीन शैक्षणिक धोरणातील  निर्माण होणारी संभ्रमावस्था दूर करण्यासाठी ही कार्यशाळा अत्यंत गरजेची आहे. यामधून सर्व प्राध्यापकांना नवीन शैक्षणिक  धोरणावर मुक्त चर्चा करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने अधिकाधिक ज्ञान देण्यासाठी नक्कीच उपयोग होणार आहे. तर प्राचार्य डॉ गायकवाड म्हणाले की, स्पर्धेमध्ये आपला विद्यार्थी टिकावा याकरता कौशल्य आधारित ज्ञान विद्यार्थ्यांना देणे गरजेचे आहे. वाणिज्य विभागाला नोकरी व व्यवसायामध्ये मोठी संधी असून बदलत्या कार्यशैलीबरोबर विद्यार्थ्यांचे ज्ञान बदलण्याकरता नवीन शैक्षणिक धोरण अत्यंत महत्त्वाचे ठरणारे आहे. तर डॉक्टर मंगेश वाघमारे म्हणाले की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनुशासत्मक शिक्षण धोरण राबवले जात आहे याचबरोबर  विद्यार्थ्यांची नोंदणी एबीसी वर करून विद्यार्थ्यांची क्रेडिट जमा करून मूल्यांकन करावे. तर डॉ. दीनानाथ पाटील म्हणाले की, काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात व मा आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली उच्च गुणवत्तेचे व आधुनिक शिक्षण प्रणाली देण्यासाठी या महाविद्यालयातून काम होत आहे.या एक दिवसीय कार्यशाळेत अहमदनगर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमधील वाणिज्य विभागातील सुमारे 300 प्राध्यापक उपस्थित होते. या कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा.टी एस जाधव यांनी केले सूत्रसंचालन कोमल मस्के यांनी केले तर बाळासाहेब वाघ यांनी आभार मानले.

COMMENTS