oplus_2 शेवगाव तालुका ः शेवगाव-नेवासा राजमार्गावरील भायगाव ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या पुनर्वसीत काळेगाव जिल्हा परिषद शाळेच्या भिंतींना घोडेग

शेवगाव तालुका ः शेवगाव-नेवासा राजमार्गावरील भायगाव ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या पुनर्वसीत काळेगाव जिल्हा परिषद शाळेच्या भिंतींना घोडेगाव येथील सध्या शेवगाव येथे वास्तव्यास असलेले नसीबखाँ पठाण उर्फ बाबू पेंटर व त्यांचे सहकारी इरफान पठाण यांनी शालेय मुलांबरोबरच पालकांनाही संदेश देणारे अतिशय बोलके चित्र रेखाटून जिल्हा परिषदेच्या भिंती बोलक्या केल्या आहेत.भायगाव ग्रामपंचायतने घेतलेल्या या निर्णयाचे ग्रामस्थांकडून स्वागत होत आहे. भारतीय जवाना विषयी अभिमान व तिरंग्या झेंड्या विषयी असणारा आदर व भारतीय सैनिकांची राष्ट्रभक्तीची प्रेरणा, व्यसनमुक्तीचा संदेश, धूम्रपान परिणाम दशा व दिशा, बेटी बचाव बेटी पढाव, पाणी वाचवा, झाडे लावा झाडे जगवा,त्याचबरोबर विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान, विविध प्राण्यांची ओळख, संख्याशास्त्र, पाढे व गणितीय ज्ञान, इंग्रजी शब्दकोश या बोलक्या भिंतीतून चित्ररूपाने साकार होत आहे.चित्र रेखाटताना पाहून शाळेतील विद्यार्थ्यासह पालकांच्या नजरा चित्रावरती खेळून राहिल्या होत्या. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संदीप आहेर सहशिक्षक लक्ष्मण पिंगळे यांनीही उपस्थित विद्यार्थ्यांसह या चित्रलेखन पाहण्याचा आनंद लुटला.
कला साहित्य गायन क्षेत्रात काम केले.चांगल्या चांगल्या गायका बरोबर गायन क्षेत्रातही काम करून अनेक पुरस्कार मिळवले. कलेची आवड असल्यामुळे विविध क्षेत्रातुन चित्रकला या क्षेत्रात अधिकच रमलो. काल्पनिक व वास्तववादी चित्र रूपाने रेखाटताना आजही मनाला खूप आनंद मिळतो. पेंटर जगातील जवळपास शेवटच्याच पिढीकडे आपण चाललो आहोत काय ? असे म्हणणे वावगे ठरणार नाही. नवनवीन तंत्रज्ञानामुळे या क्षेत्राकडे नवीन होतकरू तरुणांचे दुर्लक्ष झालेले पाहावयास मिळत आहे. एवढी खंत मनात आहे.
नसीबखाँ पठाण उर्फ पेंटर बाबू, शेवगाव अहमदनगर
COMMENTS