नाशिक : ग्राम विकास विभागाच्या मान्यतेनुसार दि. १७ नोव्हेंबर २०२३ व दि. २० नोव्हेंबर २०२३ रोजी घेण्यात आलेल्या कनिष्ठ अभियंता स्थापत्य ( बांधकाम
नाशिक : ग्राम विकास विभागाच्या मान्यतेनुसार दि. १७ नोव्हेंबर २०२३ व दि. २० नोव्हेंबर २०२३ रोजी घेण्यात आलेल्या कनिष्ठ अभियंता स्थापत्य ( बांधकाम व ग्रामीण पाणीपुरवठा) या पदाच्या परीक्षेचा निकाल आयबीपीएसकडून प्राप्त झाल्यानंतर मंगळवार दि. २८.०५.२०२४ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मान्यतेने जाहिर करण्यात आला असून तो नाशिक जिल्हा परिषदेच्या https://zpnashik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
कनिष्ठ अभियंता या पदाच्या ३४ जागांकरिता दि. १७ व दि.२० नोव्हेंबर २०२३ रोजी ऑनलाईन परीक्षा आयोजित करण्यात आली होती. सदर परीक्षेला एकूण ४३२७ परीक्षार्थीनी ऑनलाईन अर्ज सादर केले होते व त्यापैकी ३१७६ परीक्षार्थी परीक्षेला उपस्थित होते. मा. जिल्हाधिकारी जलज शर्मा व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शन व नियंत्रणाखाली, तसेच जिल्हा परिषदेच्या परीक्षेकरिता “नोडल अधिकारी” तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) रवींद्र परदेशी व जिल्हा परिषदेचे विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत आयबीपीएस या संस्थेकडून ऑनलाईन परीक्षा घेण्यात आल्यात. यातून प्रारुप निवडयादी व प्रारुप प्रतिक्षायादी तयार करुन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत मा. अध्यक्ष जिल्हा निवड समिती तथा जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात येईल व त्यांच्या मान्यतेने सदर यादीतील उमेदवार यांच्या मुळ कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे, अशी माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली.
COMMENTS