Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिक विभाग शिक्षक विधानपरिषद निवडणूक ताकतीने लढवणार : दत्तात्रय पानसरे

अहमदनगर ः नाशिक विभाग शिक्षक विधानपरिषद निवडणूक 26 जून रोजी होणार असून ही निवडणूक आपण ताकतीने लढवणार असल्याचे विधान महाराष्ट्र राज्य पणन महामंडळच

ज्या देशात परिवारात स्त्रियांची पूजा होते, तिथे सुख नांदते :ह.भ.प.दादा महाराज रंजाळे
Ahmednagar :वाराईचा प्रशन बिकट…व्यापारी गेले जिल्हाधिकाऱ्यांच्या दरबारी
आ. जगतापांमुळे येऊ शकते लॉकडाऊनची नामुष्की ; काँग्रेसच्या काळेंनी केला नाव न घेता दावा

अहमदनगर ः नाशिक विभाग शिक्षक विधानपरिषद निवडणूक 26 जून रोजी होणार असून ही निवडणूक आपण ताकतीने लढवणार असल्याचे विधान महाराष्ट्र राज्य पणन महामंडळचे विद्यमान अध्यक्ष प्रा. दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे यांनी केले आहे. घारगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर येथील सामान्य शेतकरी  कुटुंबात जन्माला आलेले पानसरे यांनी अतिशय लहान वयात आपल्या राजकीय, सामजिक कार्याला सुरुवात केलेली आहे.
अकल्पित नेतृत्वगुण, उत्तम प्रतीचे संगठन कौशल्य, धडाडीने काम करण्याची वृत्ती या गुणांमुळे कुठलाही राजकीय वारसा नसताना एक सामान्य शिक्षक ते पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, अहमदनगर जिल्हा सहकारी बँक संचालक, महाराष्ट्र राज्य पणन महामंडळ मुंबईचे विद्यमान अध्यक्ष अशा विविध पदांवर काम करण्याची संधी मिळालेली आहे. ह्या पदांवर काम करत असतना अतिशय अभ्यासपूर्वक विविध प्रश्‍नांची सोडवणूक करून जनतेला न्याय देण्याचे काम केलेले आहे. सन 1999 पासुन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे व्यवसायिक अभ्यासक्रम देणारे महाविद्यालये अहमदनगर व पुणे जिल्ह्यामध्ये सुरु करून खर्‍या अर्थाने ज्ञानगंगा खेडोपाडी पोहचविण्याचे काम केलेले आहे. त्याअंतर्गत आज राज्यभरातून हजारो विद्यार्थी दर्जेदार शिक्षण घेत असून स्वावलंबी बनून जीवन जगत आहेत. समाजाला खरी दिशादेणार्‍या शिक्षक बंधू आणि भगिनींचे वर्षानुवर्षापासून शासन दरबारी अनुदान, पेन्शन, नियुक्ती, संच मान्यता, वैद्यकीय प्रतिपूर्ती, शाळाबाह्य कामकाज असे अनेकविविध प्रश्‍न प्रलंबित आहेत. या प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नाशिक विभागातील अनेक शिक्षक बंधू आणि भगिनीं च्या आग्रहाखातर आपण ही निवडणूक लढवत असल्याचे पानसरे यांनी सांगितले.

COMMENTS