Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा २ मध्ये नाशिक जिल्हा अग्रेसर

प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्पास मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट

नाशिक : सद्यस्थितीत पर्यावरणाच्या दृष्टीने सगळ्यात मोठी समस्या ही प्लास्टिक आहे, प्लास्टिक संदर्भात प्रक्रिया व्यवस्थापन करून प्लास्टिकचा वापर कम

तरुणींमध्ये कॉलेजच्या आवारातच हाणमारी सुरू   
मुंबईला केंद्रशासित करण्याचा सोमय्यांचा कट – संजय राऊत
उन्हाळ्याची चाहूल लागल्याने मातीचे माठ, रांजण विक्रीसाठी बाजारात दाखल

नाशिक : सद्यस्थितीत पर्यावरणाच्या दृष्टीने सगळ्यात मोठी समस्या ही प्लास्टिक आहे, प्लास्टिक संदर्भात प्रक्रिया व्यवस्थापन करून प्लास्टिकचा वापर कमी करणे, प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करणे व प्लास्टिकची मूल्यवाढ करणे इत्यादी गोष्टींसाठी नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक प्लास्टिक कचरा व्यवस्थापन युनिट स्थापन करण्यात आले आहेत. यापैकी नऊ तालुक्यांमध्ये प्लास्टिक कचरा व्यवस्थापन युनिट कार्यान्वित देखील झाले आहे. नाशिक तालुक्यातील ग्रामपंचायत पिंप्री सय्यद येथील प्लास्टिक व्यवस्थापन युनिटला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दि.१० रोजी भेट दिली. प्लास्टिक कचरा व्यवस्थापन युनिटच्या कार्यपद्धतीची यावेळी त्यांनी माहिती घेऊन पाहणी केली; सदर युनिट चांगल्या पद्धतीने कार्यान्वित केल्याबद्दल त्यांनी तालुकास्तरीय यंत्रणाचे अभिनंदन केले, पुढील काळात प्लॅस्टिक संकलन करून या युनिटच्या माध्यमातून प्लॅस्टिक व्यवस्थापनाचे काम करावे अशा सूचना यावेळी त्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना दिल्या. या केंद्रामुळे प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन करणे सोपे होणार असून शास्त्रीय पद्धतीने प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे, तरी देखील नागरिकांनी प्लास्टिकचा वापर कमीत कमी करावा आणि वापरलेल्या प्लास्टिकचे संकलन ग्रामपंचायत स्तरावर करावे, प्लॅस्टिकमुळे गावातील पर्यावरण धोक्यात येणार नाही याबाबत नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले. 

जिल्ह्यात १३८८ ग्रामपंचायती असून १९१० महसुली गावे आहेत त्यापैकी ११६ गावे ही ५ हजार पेक्षा अधिक लोकसंख्येची आहेत, ती सोडून उर्वरित सर्व गावांमध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाची कामे सुरू आहे. सुमारे बाराशे गावांमध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाची कामे पूर्ण झाली आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यातील सर्व गावे मॉडेल व्हिलेज करायची असल्याने त्यासाठी घनकचरा व्यवस्थापन,  सांडपाणी व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, मैला-गाळ व्यवस्थापन इत्यादी कामे करणे आवश्यक आहे. जिल्ह्यामध्ये या सर्व घटकांचे नियोजन पूर्ण झाले असून बहुतांश ठिकाणी कामे देखील सुरू झाली आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यातील सर्व गावे मॉडेल व्हिलेज करायची असून त्यासाठी घनकचरा व्यवस्थापन,  सांडपाणी व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, मैला-गाळ व्यवस्थापन इत्यादी कामे करणे आवश्यक आहे. जिल्ह्यामध्ये या सर्व घटकांचे नियोजन पूर्ण झाले असून बहुतांश ठिकाणी कामे देखील सुरू झाली आहेत. अशी माहिती पाणी व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक दीपक पाटील यांनी दिली. यावेळी  गट विकास अधिकारी डॉ. सोनिया नाकाडे, विस्तार अधिकारी जगन्नाथ सोनवणे, श्रीधर सानप, स्वच्छता तज्ञ संदीप जाधव, ग्रामविकास अधिकारी डी.पी. गांगुर्डे आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS