Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर याच्या निषेधार्थ नाशिक शहर काँग्रेसकडून जोरदार आंदोलन

नाशिक प्रतिनिधी - सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना मानहानीच्या प्रकरणामध्ये दोषी ठरवत त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभा अध्यक्

राजकीय भूकंपाच्या चर्चांनी धरला जोर
राज्यावर पुन्हा अवकाळीचे संकट
मोदींना वाढदिवसानिमीत्त पाठविले पाच हजार पोस्ट कार्ड

नाशिक प्रतिनिधी – सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना मानहानीच्या प्रकरणामध्ये दोषी ठरवत त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभा अध्यक्षांकडून राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. याच्या निषेधार्थ संपूर्ण देशात काँग्रेस पक्षाकडून आंदोलन केले जात आहे. संपूर्ण देशात याचे पडसाद उमटू लागले आहेत. नाशिकमध्ये देखील राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या विरोधात शहर काँग्रेसकडून जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. नाशिकच्या शालिमार भागात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर शहर काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्यने शहर काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील यावेळी तैनात करण्यात आला होता.

COMMENTS