Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोकलेनचे ऑईल पंप चोरणार चोरटा नाशिक ताब्यात

म्हसवड / वार्ताहर : म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील जगन्नाथ कोडिंबा गायकवाड यांच्या मालकीची सामी 245 एलआर कंपनीच्या पोकलेन पिंपरी, ता. माण येथे शेत

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्तेंना सातारा पोलिस ताब्यात घेण्याच्या तयारीत
मेढा डेपोत नवीन बसेसचा लोकार्पण सोहळा उत्साहात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा एसटीने प्रवास
शिवसेनेच्या माजी नगरसेविकेच्या पतीवर हल्ला; राजकीय वादातून हल्ला झाल्याची चर्चा

म्हसवड / वार्ताहर : म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील जगन्नाथ कोडिंबा गायकवाड यांच्या मालकीची सामी 245 एलआर कंपनीच्या पोकलेन पिंपरी, ता. माण येथे शेत तलावाचे खोदकामाचे महिनाभरापासून काम सुरू होते. पोकलेन मशिन ऑपरेटर म्हणून सुजीत यादव (रा. बिहार) हा येथे काम करत होता. पोकलेन मालक यांनी सुजित यादव यांस फोन केला असता त्याचा फोन बंद होता. म्हणून त्यांनी मशिन जवळ जावून पाहिले असता मशिन जवळ कोणीही नव्हते. मशिनचा ऑईल पंप दिसून आला नाही, म्हणून त्यांनी हे साहित्य सुजीत यादव (रा. बिहार) यांच्या विरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार दिली. म्हसवड पोलिसांनी चोरट्याची इंतभूत माहिती घेवून आपले पथक नाशिक येथे रवाना केले. संशयित सुजीत यादव यास ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणून पोलिसी खाक्या दाखवताच पोकलेन ऑईल पंप चोरल्याची कबूली दिली. तसेच संशयिताकडून पोकलेनचा सुमारे 2 लाख रुपये किमतीचा ऑईल पंप पोलिसांनी हस्तगत केला. कारवाईमध्ये सहभागी अधिकारी व अंमलदारांचे पोलीस अधीक्षक, सातारा तसेच अपर पोलीस अधीक्षकांनी अभिनंदन केले.

COMMENTS