Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उत्‍स्‍फूर्त प्रतिसादाने बालरोग तज्‍ज्ञांच्‍या ‘नाशिकॉन २०२३’ परिषदेचा समारोप

सहभागी बालरोग तज्‍ज्ञांनी मानले आयोजकांचे आभार

नाशिक – अखिल भारतीय बालरोग तज्ज्ञ संघटनेच्‍या नाशिक शाखेतर्फे त्र्यंबकरोडवरील ग्रेप काउंटी रिसॉर्ट येथे आयोजित 'नाशिकॉन २०२३' परिषदेचा रविवारी  (

अहमदपुरात 11 जुगार अड्ड्यांवर एकाच वेळी छापा
ओबीसी आरक्षणाशिवाय कोणतीही निवडणूक घेऊ नये : ओबीसी काँग्रेसची मागणी
बायकोला अमानुष मारहाण ; नराधम पतीचा व्हिडीओ व्हायरल I LOKNews24

नाशिक – अखिल भारतीय बालरोग तज्ज्ञ संघटनेच्‍या नाशिक शाखेतर्फे त्र्यंबकरोडवरील ग्रेप काउंटी रिसॉर्ट येथे आयोजित ‘नाशिकॉन २०२३’ परिषदेचा रविवारी  (दि.११ जून) समारोप झाला. या दोन दिवसीय राज्‍यस्‍तरीय परिषदेमध्ये विविध विषयांवर चर्चा घडवितांना आधुनिक उपचार पद्धतींबाबत माहिती देण्यात आली. परिषदेच्‍या यशस्‍वी आयोजनाबद्दल सर्व सहभागी बालरोग तज्‍ज्ञांनी आयोजकांचे आभार मानले. परिषदेच्‍या दुसऱ्या दिवशी कै.डॉ.गौतम कोपीकर ओरिएंटेशन मधून बालरोग तज्‍ज्ञ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उपेंद्र किंजवडेकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच दिवसभरात तांत्रिक सत्रांसमवेत आर्थिक नियोजन, चांगले स्‍वास्‍थ्‍य राखण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

समारोप कार्यक्रमासाठी बालरोग तज्‍ज्ञ संघटना नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ.अनिरुद्ध भांडारकर, परिषदेचे संस्‍थापक अध्यक्ष डॉ.मिलिंद भराडिया, आयोजन समिती अध्यक्ष डॉ.नितीन सुराणा यांच्‍यासह डॉ.राहुल कोपीकर, डॉ.सचिन पाटील, डॉ.केदार मालवतकर, डॉ.अभय टिळक, डॉ.तानाजी कानडे आदी मान्‍यवर उपस्‍थित होते. परिषदेच्‍या दुसऱ्या दिवशी कै.डॉ.गौतम कोपीकर यांच्‍या स्मृती विशेष सत्राचे आयोजन केले होते.यामध्ये अखिल भारतीय बालरोग तज्‍ज्ञ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.उपेंद्र किंजवडेकर यांनी मार्गदर्शन केले. परिषदेतील या बीजभाषणात ते म्‍हणाले, सध्याच्‍या परिस्‍थितीत गॅझेटचा वापर वाढतो आहे. त्‍यामुळे बालवयापासून शिशूंची काळजी घेतांना आरोग्‍यावर होणारे दुष्परिणाम टाळावे. अशा स्वरूपाच्या परिषदा वारंवार होण्याची आवश्‍यकता असून, या माध्यमातून डॉक्‍टरांना योग्‍य दिशा मिळत असल्‍याचे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले. नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ.अनिरुद्ध भांडारकर यांनी दोन दिवसीय परिषदेत सहभागाबद्दल सर्व सहभागी बालरोग तज्‍ज्ञांचे आभार मानले.

परिषदेचे संस्‍थापक अध्यक्ष डॉ.मिलिंद भराडिया म्‍हणाले, दरवर्षी अशा स्‍वरुपाच्‍या परिषदांचे आयोजन केले जाते. यानिमित्त बालरोग तज्‍ज्ञांनी सहभागी होऊन आपले ज्ञान अद्ययावत करुन घ्यावे. सोबत वैद्यकीय सेवा आणि वैयक्‍तिक आयुष्य यांच्‍यातील समतोल साधत सुदृढ जीवन जगावे. परिषद आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन सुराणा यांनी परिषदेत पार पडलेल्‍या सत्रांचा लेखाजोखा मांडला. परिषद यशस्‍वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्‍या सर्व पदाधिकारी, व सदस्‍य डॉक्‍टरांचे त्‍यांनी विशेष आभार मानले. आयोजन समिती सचिव डॉ.सुलभा पवार म्‍हणाल्‍या, की सर्व सहभागी डॉक्‍टरांचा अनुभव अविस्‍मरणीय राहील. यापुढीलही नाशिकॉन परिषदेला अशाच पद्धतीने उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद द्यावा. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाशिक शाखेचे सचिव डॉ. सचिन पाटील यांनी केले.

समारोपापूर्वी दिवसभरात विविध विषयांवर सत्र झाले. यामध्ये डॉक्‍टरांनी आपले आर्थिक नियोजन कशा प्रकारे करावे यासंदर्भातही मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय टेड टॉकच्‍या माध्यमातून ज्‍येष्ठ डॉक्‍टरांनी त्‍यांच्‍या जीवनात आलेली आव्‍हाने व त्‍यावर केलेली मात याबाबतचा प्रवास उलगडून सांगितला.

काल (दि.१० जून) सायंकाळी झालेल्‍या ‘लव्‍ह यु जिंदगी’ या सांस्‍कृतिक कार्यक्रमात रॅम्‍पवॉक करतांना ‘नाशिकॉन’ परिषदेचा आजवरचा प्रवास मांडण्यात आला. तसेच ‘बॉलीवूड’ या संकल्‍पनेवर धमाकेदार सादरीकरण करण्यात आले.

परिषद यशस्‍वीतेसाठी डॉ.संजय आहेर, डॉ.प्रवीण काळे यांच्‍यासह आयोजन समिती सचिव डॉ.सुलभा पवार, सायंटिफिक कमिटीचे अध्यक्ष डॉ. तरुण कानडे, फायनान्‍स कमिटीच्‍या अध्यक्षा डॉ. वैशाली भराडिया, बालरोग तज्‍ज्ञ संघटनेचे सचिव डॉ.सचिन पाटील,  सहसचिव डॉ. मिलिंद गांगुर्डे, खजिनदार डॉ.प्राची बिरारी, डॉ.पवन देवरे, डॉ.शीतल मोगल, डॉ.प्रकल्‍प पाटील, डॉ. सुशील पारख, डॉ.अमोल मुरकुटे, डॉ.तृप्ती महात्‍मे, डॉ.सचिन चौधरी,  डॉ.सागर सोनवणे, डॉ.रवि सोनवणे, डॉ.सदाचार उजळणकर, डॉ.नितीन मेहकटकर, डॉ.अमित पाटील, डॉ.शीतल जाधव, डॉ.सुनिता दराडे, डॉ.कविश मेहता आदी परिश्रम घेत आहेत.

COMMENTS