Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिला राष्ट्रवादीतर्फे मोटार सायकल रॅली काढून नारी शक्तीचे दर्शन

इस्लामपूर : महिला राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेली मोटार सायकल रॅलीत सहभागी झालेल्या महिला कार्यकर्त्या. इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर शहर महिला

हेळगावचे उपसरपंच पद तीन जणांना विभागून दिले जाणार: ग्रामपंचायतीची पहिली सभा संपन्न
वनश्री महाडीक मल्टीस्टेट सोसायटीला 56 लाखांचा नफा : राहुल महाडीक
इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील सर्व निवडणुका महाडिकांसोबत लढणार : वैभव नायकवडी

इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर शहर महिला राष्ट्रवादी पक्षातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त शहराच्या मुख्य रस्त्यावरून मोटार सायकल रॅली काढून नारी शक्तीचे दर्शन घडविले. पूर्वी घराचे अंगण लोटण्यापलीकडे महिला घराचा उंबरा ओलांडत नव्हत्या. मात्र, आज प्रत्येक क्षेत्रात आपल्या भगिनी उत्तुंग कामगिरी करत आहेत. तुमचे एक धाडसी पाऊल तुम्हाला यशाच्या महामार्गावर घेवून जाईल, असा विश्‍वास शहराध्यक्ष रोझा किणीकर यांनी व्यक्त केला.
शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कचेरी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून ही मोटार सायकल मोठ्या उत्साहात सुरू करण्यात आली. जयंत नेत्रालय, शिवाजी चौक, आष्टा नाका, झरी नाका, आझाद चौक, लाल चौक, गांधी चौक, यल्लाम्मा चौकातून राष्ट्रवादी कार्यालयासमोर रॅलीची सांगता करण्यात आली. फेटे गुंडलेल्या महिला भगिनींनी शहराचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभागृहात महिला भगिनींनी एकमेकीला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
रोझा किणीकर म्हणाल्या, आपल्या देशातील माता जिजाऊपासून सावित्रीबाई फुले यांच्यापर्यंत आणि इंदिरा गांधीपासून कल्पना चावला यांच्यापर्यंत कर्तृत्ववान महिलांची मोठी परंपरा आहे. आपणास त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालावे लागेल. महिला स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. आपली धावण्यात वेगावर मर्यादा ठेवल्या तर आपल्या ध्येयापासून आपणास कोणी रोखू शकत नाही.
यावेळी माजी नगराध्यक्ष अरुणादेवी पाटील, महिला राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुस्मिता जाधव, उषा पंडीत-मोरे, पुष्पलता खरात, शैलजा जाधव, अलका शहा, माजी नगरसेविका सुनीता सपकाळ, संगिता कांबळे, सुनंदा साठे, सुवर्णा जगताप, प्रतिभा पाटील, मनिषा पेठकर, योगिता जाधव, मंदाकिनी चव्हाण, डॉ. सुवर्णा माळी, डॉ. स्वाती कुंडले, जायंटस ग्रुपच्या संगीता शहा, कविता शहा, प्रतिभा शहा, श्रध्दा कुलकर्णी, मधु फौंडेशनच्या मंगल देसावळे, युवती शहराध्यक्ष प्रियांका साळुंखे, ब्रह्मकुमारीच्या भगिनी तसेच महिला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या. प्रारंभी उषा पंडीत-मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक करत महिला दिनाचे महत्व सांगितले. यावेळी डॉ. सुवर्णा माळी, युवती शहराध्यक्ष प्रियांका साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले. अलका शहा यांनी आभार मानले.

COMMENTS