नाशिक: येथील प्रसिध्द नारायणी हॉस्पिटल च्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त विविध उपक्रम आयोजीत करण्यात आल्याची माहिती मधुमेह व हृदयविकार तज्ञ डॉ. प
नाशिक: येथील प्रसिध्द नारायणी हॉस्पिटल च्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त विविध उपक्रम आयोजीत करण्यात आल्याची माहिती मधुमेह व हृदयविकार तज्ञ डॉ. पंकज राणे, अस्थिविकार तज्ञ डॉ. मनीष चोकसी, किडनीविकार व डायलेसिस तज्ञ डॉ. देवीकुमार केळकर, श्वसन विकार तज्ञ डॉ. स्वप्निल साखला, मेंदुविकार तज्ञ डॉ. आनंद दिवाण, कॅन्सर विकार तज्ञ डॉ. अजय जाधव, लेप्रोस्कोपी सर्जन डॉ. दिनेश जोशी , बालविकार तज्ञ डॉ.दिपा जोशी, स्त्रीरोग तज्ञ डॉ. मयुरी केळकर, पंचकर्म तज्ञ डॉ. मोनाली राणे यांनी दिली.
मंगळवार दि. 6 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मधुमेह, हृदयविकार, किडनीविकार, श्वसन विकार, मेंदुविकार, कॅन्सर समस्या, लहान मुलांच्या समस्या, पंचकर्म, महिलांच्या आरोग्य समस्या, पोटाच्या समस्या, सांधेबदल शस्त्रक्रिया, लेप्रोस्कोपी सर्जरी यासारख्या समस्यांनी त्रस्त असलेल्या रुग्णासाठी पूर्णपणे तपासणी ( opd) मोफत करण्यात आली आहे
वर्धापनदिनानिमित्त सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
COMMENTS