Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अकोले तालुक्यातून नंदिनी देशमुख मुलींमध्ये तालुक्यात प्रथम

अकोले ः श्री अगस्ति एज्युकेशन सोसायटीचे महात्मा फुले विद्यालय सुगाव बु.या विद्यालयाचा एसएससी मार्च 2024 चा निकाल 97.50 इतका लागला असून विद्यालयाच

कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागावर पाणी टंचाईचे सावट
पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेला 825 उमेदवारांनी मारली दांडी
‘ये आझादी झुठी है’ चा नारा आजही खरा वाटतो ः अ‍ॅड.नितीन पोळ

अकोले ः श्री अगस्ति एज्युकेशन सोसायटीचे महात्मा फुले विद्यालय सुगाव बु.या विद्यालयाचा एसएससी मार्च 2024 चा निकाल 97.50 इतका लागला असून विद्यालयाची विद्यार्थिनी नंदिनी संदीप देशमुख हिने 97 टक्के गुण मिळवत विद्यालयात प्रथम तर तालुक्यात मुलींमध्ये सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळविल्याने सुगाव बु , मनोहरपूर व वाशेरे परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. थोर स्वातंत्र्यसैनिक गुरुवर्य बा.ह.नाईकवाडी तथा बाबा यांनी विशेष करून बहुजनांसाठी त्यातही मुलींसाठी शिक्षण अधिक सुलभ व्हावे यासाठी संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी स्वतःला झोकून दिले व तीच परंपरा संस्थेने राखत निकालाची घोडदौड कायम ठेवली आहे. वेळोवेळी संस्थेने केलेल्या मार्गदर्शनानुसार विद्यालयात जादा तासिकांचे नियोजन, वैयक्तिक मार्गदर्शन, सराव यामुळे संस्थेच्या सर्वच विद्यालयातील निकाल कौतुकास्पद आहे. विद्यालयात अनुक्रमे प्रथम देशमुख नंदिनी संदीप 97, द्वितीय घुले रिषभ दत्तात्रय 90.80, तृतीय देशमुख पवन भाऊसाहेब 89.60, चतुर्थ गजे तृप्ती सुर्यभान 86.40, पाचवा विभागून शिंदे सार्थक सोमनाथ 84.20, देशमुख तेजस अरुण 84.20 यांनी यश मिळवत शाळेच्या गुणवत्तेची यशाची परंपरा राखली आहे. या यशाबद्दल  संस्थेच्या सेक्रेटरी दुर्गाबाई नाईकवाडी, अध्यक्ष शैलजा पोखारकर, कार्याध्यक्ष शिरीष नाईकवाडी, सतीश नाईकवाडी, संदीप नाईकवाडी, मुख्याध्यापक सिताराम पथवे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ व समस्त ग्रामस्थ सुगाव बु, मनोहरपूर, वाशेरे यांचेकडून यशस्वी विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS