मनसेच्या नांदगावकरांनी केला (स्व.) राठोडांच्या कार्याचा गौरव

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनसेच्या नांदगावकरांनी केला (स्व.) राठोडांच्या कार्याचा गौरव

अहमदनगर/प्रतिनिधी : शिवसेनेत असताना कधीकाळी एकत्र काम केल्याची आठवण ठेवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी नगरचे शिवसेनेचे उपनेते

भोजनेवाडी येथे संविधान भवनाचे भूमिपूजन
प्रियंका शिंदे यांना महिला लिडर बिझनेस पुरस्कार
जोतिबाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या शेतमजुरांची ट्रॅक्टर ट्रॉली उलटली ; एक ठार, 20 जण जखमी |

अहमदनगर/प्रतिनिधी : शिवसेनेत असताना कधीकाळी एकत्र काम केल्याची आठवण ठेवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी नगरचे शिवसेनेचे उपनेते व माजी आमदार (स्व.) अनिलभय्या राठोड यांच्या कार्याचा रविवारी गौरव केला. अनिल भैय्यांनी कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण केली, असे गौरवोदगार त्यांनी व्यक्त केले.
मनसे नेते नांदगांवकर नगर येथे आले असता त्यांनी शिवालय येथे स्व. राठोड यांच्या जयंतीदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड, माजी महापौर अभिषेक कळमकर, जिल्हा उपाध्यक्ष गिरीश जाधव, लंकेश हरबा, सचिन डफळ, सुमित वर्मा, मृणाल भिंगारदिवे आदी उपस्थित होते. यावेळी नांदगावकर यांनी स्व. राठोड यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी विक्रम राठोड यांनी त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.
आमदार म्हणून अनिल राठोड यांनी नगर शहरासह जिल्ह्यात मोठे काम केले. हिंदूत्वाचे मोठे प्रचारक म्हणून ते कार्यरत होते. जिल्ह्यात हिंदूत्व रुजविण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांना विविध पदांच्या माध्यमातून महापालिका तसेच विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनिल राठोड यांच्या सहकार्याने सत्ता मिळविता आल्या. अनिलभैय्यांनी कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण केली, त्याचा उपयोग नेहमीच हिंदूत्वासाठी झाला. सर्वसामान्यांमध्ये त्यांनी लढण्याचा जो विश्‍वास निर्माण केला, तो प्रत्येकाच्या मनात आजही आहे. त्यांचे कार्य कोणीही विसरु शकत नाही, असे प्रतिपादन नांदगांवकर यांनी यावेळी केले.

COMMENTS