श्रीरामपूर ः अशोक उद्योग समूहाचे सूत्रधार माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचे मार्गदर्शनाखालील अशोक कामगार पतसंस्थेच्या महिला संचालकपदी नंदा भानुदास
श्रीरामपूर ः अशोक उद्योग समूहाचे सूत्रधार माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचे मार्गदर्शनाखालील अशोक कामगार पतसंस्थेच्या महिला संचालकपदी नंदा भानुदास ढूस यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अशोक कामगार पतसंस्थेच्या सन 2022 ते 2027 या कालावधीसाठीचे संचालक मंडळातील एक जागा रिक्त झाल्याने सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, श्रीरामपूर कार्यालयाचे मुख्य लिपिक राजेश जोशी यांचे अध्यतेखाली सदरची निवडणूक प्रक्रिया पार पडली. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब दोंड, व्हा.चेअरमन संतोष जाधव, संचालक लव शिंदे, डॉ.मंगेश उंडे, आण्णासाहेब वाकडे, हरीभाऊ गायके, भाऊसाहेब आसने, प्रदीप शिंदे, विकास दांगट, दत्तात्रय झुराळे, संदीप डोळस, ज्ञानेश्वर मुठे, अशोक पारखे, महिला संचालिका सौ.लिलाबाई बागडे, सचिव दिपक बडजाते, सुदर्शन पवार, दादासाहेब वेताळ आदि उपस्थित होते. नवनिर्वाचित संचालिका नंदा ढूस यांचे कारखान्याचे चेअरमन माजी आमदार भानुदास मुरकुटे, व्हा.चेअरमन हिम्मतराव धुमाळ, अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडीराम उंडे, उपाध्यक्ष योगेश विटनोर, ग्रो इंडस्ट्रीज अॅण्ड डेव्हलपमेंट फाउंडेशन अध्यक्ष सोपानराव राऊत, उपाध्यक्ष बाबासाहेब आदिक, सचिव विरेश गलांडे, युवक नेते सिद्धार्थ मुरकुटे, संचालिका मंजुश्रीताई मुरकुटे, कार्यकारी संचालक संतोष देवकर तसेच कारखाना संचालक मंडळाने अभिनंदन केले आहे.
COMMENTS