Homeताज्या बातम्यामनोरंजन

नाना पाटेकरांनी चाहत्याची हात जोडून मागितली माफी

मुंबई प्रतिनिधी - बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर नेहमीच आपल्या दमदार अभिनयामुळे आणि भूमिकांसाठी चर्चेत असतात. मात्र यावेळी ते चाहत्यांच

म्हणे, वेश्यानां आधार…
प्रा. सचिन गायवळ यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
बिहार विधानसभा अध्यक्ष-मुख्यमंत्री खडाजंगी सांस्कृतिक विरोधाभास!

मुंबई प्रतिनिधी – बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर नेहमीच आपल्या दमदार अभिनयामुळे आणि भूमिकांसाठी चर्चेत असतात. मात्र यावेळी ते चाहत्यांच्या निशाण्यावर सापडले आहेत. नाना पाटेकर यांनी रागाच्या भरात एका चाहत्याला थप्पड मारली आहे. अभिनेत्याने चाहत्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शकाने यावर स्पष्टीकरण दिले आहे. आता नाना पाटेकरांनी व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेता नाना पाटेकर यांनी नुकताच वाराणसी येथे एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एका चाहत्याला जोरात चापट मारली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. या व्हिडीओतील नाना पाटकेरांच्या कृत्याने नेटकरी संतप्त झाले असून त्यांनी नाना पाटेकरांवर जोरदार टीका केली. आता या संपूर्ण घटनेनंतर नाना पाटेकर यांनी स्पष्टीकरण देत माफी मागितली आहे. त्याने या चाहत्यांची हात जोडून माफी मागितली. यासंदर्भातील त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नाना पाटेकर सध्या ‘जर्नी’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. वाराणसी येथे या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. याचदरम्यान, दशाश्वमेध घाटाजवळ शूटिंग सुरू असताना नाना पाटेकरांना पाहून एक चाहता त्यांच्याजवळ येऊन सेल्फी काढू लागला. तरा नाना पाटेकर यांनी संतप्त होत त्या चाहत्यांच्या डोक्यात जोरात चापट मारली आणि त्याला तिथून पळवून लावले. नाना पाटेकर यांचे हे कृत्य त्याच्या चाहत्यांसह नेटिझन्सला खूपच खटकले. या घटनेनंतर त्यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार टीका होऊ लागली. त्यानंतर नाना पाटेकर यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करत या घटनेबाबत स्पष्टीकरण दिले आणि चाहत्याची माफी मागितली

COMMENTS