Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे विमानतळाला संत तुकारामांचे नाव द्या

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ ः राज्य सरकारला प्रस्ताव पाठवण्याची सूचना

पुणे : पुण्यातील आंतरराष्ट्रील लोहगाव येथील विमानतळाला जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे नाव देण्यात यावे, त्यासाठी राज्य सरकारने प्रस्ताव

कोयत्याच लोण शाळांपर्यत, दहावीचा पेपर सुटला अन् विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ला 
 माझ्या यशात समता परिवाराचे महत्त्वपूर्ण योगदान ः अक्षय आव्हाड
गोवंश हत्या करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा… मुस्लिम समाजाने केली मागणी (Video)

पुणे : पुण्यातील आंतरराष्ट्रील लोहगाव येथील विमानतळाला जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे नाव देण्यात यावे, त्यासाठी राज्य सरकारने प्रस्ताव तयार करून केंद्र सरकारकडे पाठवावा अशी सूचना केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देतांना मोहोळ म्हणाले, आपल्या भूमिकेवर राज्य सरकारही सकारात्मक असून लवकरच हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाईल. त्यानंतर केंद्र सरकारकडे आपण याचा पाठपुरावा करणार आहे. विमानतळाचे नामकरण करतानाचा नावाचा प्रस्ताव हा राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे येत असतो आणि त्यानंतर नामांतरावर शिक्कामोर्तब होते, म्हणूनच पुण्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने राज्य सरकारकडे ही भूमिका मी मांडली आहे.

पुण्याचे विमानतळ असलेल्या लोहगावमध्ये जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबारायांचे आजोळ होते. त्यामुळे लोहगाव आणि तुकोबारायांचे नाते जिव्हाळ्याचे होते. लोहगावच्या गावकर्‍यांचीही आपल्या भूमिकेप्रमाणेच इच्छा असून, महाराष्ट्रातील तमाम वारकरी संप्रदायाचीही संवेदना या विषयाशी जोडलेली आहे. त्यामुळे लोहगावच्या विमानतळाला तुकोबारायांचे नाव देणे, हे अधिक समर्पक असणार आहे.
मुरलीधर मोहोळ, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री

COMMENTS