Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नागवडे स्कूलने केला गुणवंत विद्यार्थ्यांसह पालकांचा सन्मान

श्रीगोंदा शहर : नुकत्याच जाहीर झालेल्या सी.बी.एस.ई.दहावी बोर्ड परीक्षेमध्ये विद्यालयात प्रथम पाच क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थी शुभ्रा सारंगकर, त

राज्याच्या आरोग्यव्यवस्थेची श्‍वेतपत्रिका काढा
Sangamner : बोगस शिधापत्रिका प्रकरण शिवसेनेच्या विद्यमान पदाधिकाऱ्याला भोवणार?
पोलिसाने पोलिसावरच चालवली बंदूक… थोडक्यात टाळला अनर्थ…

श्रीगोंदा शहर : नुकत्याच जाहीर झालेल्या सी.बी.एस.ई.दहावी बोर्ड परीक्षेमध्ये विद्यालयात प्रथम पाच क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थी शुभ्रा सारंगकर, तनिष्का कांबळे, सागर कुमार, अभिनव गोरे, परी कालिया यांच्यासह पालकांचा आणि मार्गदर्शक शिक्षकांचा शिवाजीराव नागवडे डॅफोडील्स स्कूलच्या वतीने सन्मान करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या पुढील करिअरच्या तसेच स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने आवश्यक असणारा सी.बी.एस.ई.अभ्यासक्रम, अनुभवी मार्गदर्शक शिक्षक, विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकून प्रोत्साहन दिल्याबद्दल शालेय प्रशासनाचे पालक प्राचार्य हेमंत कांबळे यांच्यासह उपस्थित पालकांनी आभार मानले. यावेळी तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे निरीक्षक एस.पी. गोलांडे, सोनिया गांधी पॉलिटेक्निकचे प्राचार्य अमोल नागवडे, मुख्याध्यापिका नीतू दुलानी, भाऊसाहेब होरे, वैशाली नागवडे राहुल भांडवलकर, योगेश सागडे, मोजेस खवाडिया, अक्षय मेहेत्रे,स्मिता भोईटे उपस्थित होते.

COMMENTS