Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात 

नागपूर प्रतिनिधी - नागपूर विभाग शिक्षक मतदारसंंघातील निवडणूक निकालाची उत्सुकता वाढली असून, गुरुवारी २ फेब्रुवारीला सकाळी ८ वाजता मतमोजणीला सु

चांद्रयान-3′ अखेरच्या टप्प्यात
..तर, ओबीसींचा राजकीय स्फोट दोघांनाही उद्ध्वस्त करेल !
  दारूच्या नशेत पोलिसाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं  

नागपूर प्रतिनिधी – नागपूर विभाग शिक्षक मतदारसंंघातील निवडणूक निकालाची उत्सुकता वाढली असून, गुरुवारी २ फेब्रुवारीला सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. अजनीतील सामुदायिक भवनात मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण २८ टेबलवर मतमोजणी होणार आहे. स्ट्राँगरूममधून बाहेर काढण्यात आलेल्या मतपेट्यांतील मतपत्रिका मिक्सिंग ड्रममध्ये एकत्र करण्यात येतील आणि त्यांनतर प्रत्येक टेबलवर १ हजार मतपत्रिका याप्रमाणे मतमोजणीस सुरुवात होईल. यावेळी उमेदवार आणि प्रत्येक उमेदवाराचा एक प्रतिनिधी उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

२ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वाजता मतपेट्या बंद केलेली स्ट्राँगरूम उघडण्यात येईल. प्रत्यक्ष मतमोजणीस सकाळी ८ वा. सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी, निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. विजयलक्ष्मी बिदरी मतमोजणी केंद्रावर उपस्थित मतमोजणी अधिकारी, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी आदींना गोपनीयतेची शपथ  देतील. नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी सोमवारी सहा जिल्ह्यांमध्ये सरासरी ८६.२६ टक्के मतदान  झाले. या निवडणुकीत  नागो गाणार, सुधाकर अडबाले आणि राजेंद्र झाडे यांच्यात लढत आहे,  त्यांच्यासह २२ उमेदवार रिंगणात आहेत.

COMMENTS