नगरचे काहीजण त्यांच्यामुळे विधीमंडळात…कळमकरांच्या सत्कारात काळेंचे सूचक भाष्य

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरचे काहीजण त्यांच्यामुळे विधीमंडळात…कळमकरांच्या सत्कारात काळेंचे सूचक भाष्य

अहमदनगर/प्रतिनिधी : माजी आमदार दादा कळमकर यांनी आपल्या अनेक वर्षांच्या राजकीय कारकीर्दीमध्ये शहरातील अनेक नवोदित कार्यकर्त्यांना राजकारणाच्या मुख्य प

गावातील कीर्तनकारांच्या सेवेने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता
शिवद्रोही श्रीपादसह बंधू श्रीकांत छिंदमही तडीपार | DAINIK LOKMNTHAN
घोगरगाव ग्रामसभेचा ठराव होऊनही कारवाई नाही

अहमदनगर/प्रतिनिधी : माजी आमदार दादा कळमकर यांनी आपल्या अनेक वर्षांच्या राजकीय कारकीर्दीमध्ये शहरातील अनेक नवोदित कार्यकर्त्यांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणत त्यांना कायम बळ देण्याचे काम केले. आज यातील अनेकजण महापालिकेचे नगरसेवक म्हणून काम करत आहेत. तर काहींना दादाभाऊ यांच्यामुळेच विधिमंडळाची पायरी चढण्याची संधी मिळाली, असे सूचक भाष्य काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी येथे केले. दरम्यान, काळे यांनी असे भाष्य करताना कोणाचेही नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख त्यांचे विरोधक राष्ट्रवादीचे शहराचे आमदार संग्राम जगताप व त्यांचे वडील विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांच्या दिशेने असल्याची चर्चा जोरात सुरू आहे.
माजी आमदार कळमकर यांचे वाढदिवसानिमित्त शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने नुकतेच अभीष्टचिंतन करण्यात आले. शहर जिल्हाध्यक्ष काळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मनपाचे माजी विरोधी पक्ष नेता दशरथ शिंदे, ओबीसी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अनंत गारदे, शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, क्रिडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते, शहर जिल्हा खजिनदार मोहन वाखुरे, विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हा प्रभारी अनीस चुडीवाला, ज्येष्ठ नागरिक मंचाचे आप्पासाहेब खताडे उपस्थित होते.
कळमकर यांनी नगर जिल्हा व शहरातील राजकीय चळवळीमध्ये अनेक माणसे घडविण्याचे काम केले आहे. नवोदित चेहर्‍यांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणत नेतृत्व करण्याची संधी त्यांनी अनेकांना दिली असल्याचे सांगून काळे म्हणाले, देशाचे नेते खा. शरदचंद्र पवार यांचा विश्‍वास संपादन करणे ही साधारण गोष्ट नाही. पवार यांचा विश्‍वास संपादन करीत दादाभाऊ यांनी अनेक वर्ष शहर व जिल्ह्यात नेतृत्व केले. आजही त्यांची शरद पवार यांच्यावर नितांत श्रद्धा आहे. पवारांच्या जुन्या विश्‍वासू सहकार्‍यामध्ये दादाभाऊ असून पवारांनी देखील त्यांची आजवर कधीच साथ सोडली नाही, असेही काळे यांनी आवर्जून सांगितले. आजही दादांना मानणारा मोठा वर्ग नगर शहरामध्ये व जिल्ह्यात आहे. त्यांच्या अनेक वर्षांच्या राजकीय अनुभवाचा उपयोग तरुण पिढीला होऊ शकतो. त्यांनी नवीन पिढीला मार्गदर्शन करण्याचे काम सातत्याने सुरू ठेवावे, असे आवाहनही काळे यांनी केले.

COMMENTS