कोपरगाव शहर ः सबंध राज्यभरात गेल्या काही दिवसापासून पावसाने हाहाकार माजवला असून अनेक ठिकाणच्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडून संपूर्ण जनजीवन विस
कोपरगाव शहर ः सबंध राज्यभरात गेल्या काही दिवसापासून पावसाने हाहाकार माजवला असून अनेक ठिकाणच्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडून संपूर्ण जनजीवन विस्कळीत केले असताना पवित्र दक्षिण गंगा म्हणून परिचित असलेली गोदावरी नदी अद्यापही कोरडी ठाक असून धरणात देखील म्हणावा असा नव्याने पाणीसाठा उपलब्ध न झाल्याने बळीराजासह सामान्य नागरिक देखील चिंतेत सापडला आहे.
दमदार पाऊस येईल या आशेने नगर जिल्ह्यातील बहुतांश शेतकर्यांनी विहिरीत असलेल्या पाण्याच्या भरवशावर पेरण्या केल्या होत्या परंतु अद्यापही पाऊस न झाल्याने विहिरीनी तळ गाठला असून येणार्या रिमझिम पावसावर पिकांनी कसा बसा तग धरला आहे परंतू अनेक प्रकारच्या रोगांनी पिकांवर आक्रमण केल्याने बळीराजा त्यावर औषध फवारणी करून हैराण झाला आहे. होऊन बळीराजा पूर्णतः हवालदील झाला असून आज ना उद्या मोठा पाऊस येईल या आशेने आभाळाकडे डोळे लावून देवाकडे प्रार्थना करत बसला आहे. अनेक भागातील विहिरीं व बोअरवेलने तळ गाठल्याने ऐन पावसाळ्यात पिण्याचा पाण्याचा वनवा भासत आहे तर पाटबंधारे खात्याच्या चुकीच्या नियोजनामुळे अनेक गावतळी कोरडी पडली आहे तर कोपरगाव शहराला बारा दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. गेल्या दोन वर्षापासून नगर नाशिक जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाने होरपळत असून राज्यकर्त्यांनी आपापल्या पक्ष बळकटी करण्याकडे लक्ष देता देता उध्वस्त होत चाललेल्या बळीराजाचे पुनर्वसन कसे होईल याकडे कटाक्षाने लक्ष देत तज्ञांच्या मार्गदर्शनाने कृत्रिम पाऊस आता कसा पाडता येईल याकडे देखील आत्ताच लक्ष द्यायला हवे नाहीतर नगर नाशिक जिल्ह्यातील शेतकर्यांसह सामान्य नागरिकांना येणार्या काळात स्थलांतर केल्याशिवाय पर्याय राहणार नाही याची दखल आत्ताच राज्यकर्त्यांनी घ्यायला हवी.
जिल्ह्यातील तालुका निहाय पर्जन्य
नगर-62
पारनेर-67
श्रीगोंदा-92
कर्जत-89
जामखेड-74
शेवगाव-59
पाथर्डी-89
नेवासा-51
राहुरी-47
संगमनेर-57
अकोले-51
कोपरगाव-52
श्रीरामपूर-44
राहाता-46
कोपरगाव तालुक्यातील पेरणी हेक्टरमध्ये
बाजरी-617
मका-15402
भुईमूग-248.50
सोयाबीन-20843
कापूस- 1350.40
ऊस लागवड- 13
भाजीपाला- 486
चारा पिके- 4901
COMMENTS