भोकर प्रतिनिधी - भोकर येथिल सेवा समर्पण परिवाराच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात निस्वार्थ समर्पित भावनेने काम करणार्या व्यक्तींना

भोकर प्रतिनिधी – भोकर येथिल सेवा समर्पण परिवाराच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात निस्वार्थ समर्पित भावनेने काम करणार्या व्यक्तींना पुरस्कार देण्यात येतो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सेवा समर्पण परिवाराच्यावतीने मराठवाडा स्तरीय आनंद बागच्या श्री व सौ.संध्या दत्ता बारगजे पाली जिल्हा बीड यांना सेवा समर्पण पुरस्कार समाज सेवेसाठी देण्यात आला तर जेष्ठ पत्रकार,साहित्यिक आसाराम लोमटे परभणी यांना साहित्यासाठी सदरील पुरस्कार देण्यात आला.सदरील पुरस्कारात अकरा हजार रोख रक्कम, मानचिन्ह, शाल, हार देऊन वरील सन्मानीत व्यक्तींना सन्मानीत करण्यात आले हा कार्यक्रम कै.दिगंबरराव बिंदू महाविद्यालय भोकर येथे संपन्न झाला. सत्कारमूर्ती दत्ता बारगजे बोलताना म्हणाले की माणूस हा संगतीने व सहवासाने घडतो कारण बाबा आमटे व प्रकाश आमटे याच्या सोबतीने मी घडलो व आनंद बागची स्थापना करुन तेथे दिन दुबळ्या व एच. आय. व्ही.रोगग्रस्तांच्या पीडितांच्या संगोपणा चा मार्ग धरला यातूनच समाज सेवा करण्याची संधी मिळाली हेच माझे भाग्य समजतो तर डॉ. सबनीस म्हणाले की गांधी, आंबेडकर यांच्या विचाराची बेरीज करणे गरजेचे आहे कारण लोकशाही कोण्या मार्गांवर जात आहे टिकेल की नाही याची खंत व्यक्त केली.महापुरुषांना वाटून घेतले जात आहे राजकारण वेगळे वळण घेत आहे.पुढे बोलतांना म्हणाले की वेदनेला जात नसते मानवता व सत्याचा शोध घेतला पाहिजे विधायक कामे केली पाहिजे बारगजे कुटुंबीयात बाबा आमटेचा अंश आहे ध्येय गाठाण्यासाठी वेड झालं पाहिजे त्यांची सेवा समर्पित आहे त्यांचं कौतुक शब्दाने शक्य नाही असेही गौरव उदगार यावेळी काढले तर एड्स ग्रस्तनाच्या वेदना, दुःख, हे काम करीत असताना येणार्या अडचणी, आपण याकडे कसे वाळलो,काम करत आसताना येणारा अनुभव बारगजे कुटूंबाने कथन करून सर्वांना अस्वस्थ केलं. जे कार्य सेवा समर्पण या ठिकाणी करत आहे त्यांना मी मनापासून वदंन करतो असेही ते या वेळी म्हणाले. साहित्यिक लोमटे शब्दांनी वेदना कमी व्हाव्यात स्वप्न व वास्तव यातील अंतर कमी व्हावी अशी अशा व्यक्त केली तर सेवा समर्पण लोकहिताचे काम करीत असल्याचे समाधान व्यक्त केलं.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मयत तलाठी नरेंद्र मुडगुलवार यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीत डॉ.श्रीपाल सबनीस( 89 वे अध्यक्ष अ. भा. मराठी साहित्य संमेलन पुणे),अध्यक्ष राजेंद्र खंदारे (अपर सचिव उपमुख्यमंत्री कार्यालय मुंबई ), प्राचार्य ड्रॉ.पंजाब चव्हाण ( कै.दिगंबरराव बिंदू महाविद्यालय भोकर) कैलास गड भोकर येथील महंत उत्तम बन महाराज, सेवा समर्पण चे अध्यक्ष राजेश्वर रेडी लोकावाड,कृषी सभापती बाळासाहेब पाटिल रावणगावकर, नामदेव आयलवाड, सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष माधव अमृतवाड,पत्रकार विठ्ठल फुलारी, डॉ.किरण पांचाळ डॉ.यू एल जाधव, गजानन आडकिने राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा महासचिव, संपादक उत्तम बांबळे व पत्रकार बांधव यांच्यासह सेवा समर्पण परिवाराचे सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.जोशी मॅडम यांनी केले तर आभार सेवा समर्पण परिवाराचे सचिव तथा दै.पुढारीचे तालुका प्रतिनिधी पत्रकार विठ्ठल फुलारी यांनी मानले.
COMMENTS