Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्व.काकू-नाना मुळेच माझे अस्तित्व !

स्व.काकूंच्या जयंती निमित्त समाधी स्थळे जाऊन आ.संदीप क्षीरसागर झाले नतमस्तक

बीड। प्रतिनिधी - स्वर्गीय खा.केशरकाकू व स्व.सोनाजीराव नानांनी आजी-आजोबा या नात्याने माझ्यावर जे संस्कार केले आणि खासदार या नात्याने मला राजकारणाश

शिक्षकांच्या गाडीला मुंढेगावजवळ अपघात, ३ ठार तर ४ गंभीर | LOKNews24
बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याने राजूरीच्या पोलीस पाटलाचे निलंबन
किरकोळ वादातून परप्रांतीय तरुणाच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून 

बीड। प्रतिनिधी – स्वर्गीय खा.केशरकाकू व स्व.सोनाजीराव नानांनी आजी-आजोबा या नात्याने माझ्यावर जे संस्कार केले आणि खासदार या नात्याने मला राजकारणाशी आणि जनतेशी एकरूप राहण्याचे जे धडे शिकविले ते मला आजही मुखपाठ असून आपण दिलेल्या मार्गदर्शनामुळे माझे अस्तित्व आहे असे भावनिक उद्गागार आ.संदीप क्षीरसागर यांनी स्व.खासदार केशरकाकू क्षीरसागर यांच्या जयंतीनिमित्त समाधीस्थळी अभिवादन करतांना व्यक्त केले.
त्याकाळी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये राजुरी गावाचे सरपंच ते दिल्लीपर्यंत प्रवास कसा केला असेल याचा विचार मी आजही करतो जिल्ह्यातील व विधानसभेतील जनतेने आपल्यावर अथांग प्रेम केले होते. गजानन सहकारी साखर कारखान्याची त्याकाळी उभारणी करून ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना आधार दिला. आशिया खंडातील पहिल्या  महिला चेअरमन म्हणून अनेक वर्ष कारखाना चालवला. आज परत एकदा त्यांनी उभा केलेल्या गजानन कारखान्यांनी गरूडझेप घेतली आहे. तसेच या बरोबरच स्व.काकूंनी सरपंच,सभापती, आमदार, खासदार या पदापर्यंत मजल केली. स्व.काकूंनी अनेक दशक बीड जिल्ह्याचे खासदार म्हणून दिल्लीत प्रतिनिधित्व केले. आज माझी वाटचाल सुद्धा स्व.काकू-नानांच्या विचारावर आणि पावलावर पाऊल ठेवून असून आज हे सर्व पाहण्यासाठी स्व.काकू-नाना आणि स्व.आई नाहीत याचे मनात अतोनात दुःख आहे. आपले व आईचे आईचे छत्र माझ्या डोक्यावर नाही याची मनात खंत तहहयात राहणार आहे.

COMMENTS