Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विकास कामांना निधी मंजूर करण्याचा माझा प्रयत्न : ना. शंभूराज देसाई

कराड / प्रतिनिधी : पाटण विधानसभा मतदार संघासह आपल्या मरळी गावाचे नाव राज्यामध्ये नावारुपाला आणण्याचे काम लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी केले. लोकन

बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटण्याचा अधिकार फक्त आम्हालाच
शासन आपल्या दारी अभियानाचा सातारा पॅटर्न राबवा : पालकमंत्री शंभूराज देसाई
जिल्हा वार्षिक योजनेचा निधी मार्च अखेरपर्यंत शंभर टक्के खर्च करा : ना. शंभूराज देसाई

कराड / प्रतिनिधी : पाटण विधानसभा मतदार संघासह आपल्या मरळी गावाचे नाव राज्यामध्ये नावारुपाला आणण्याचे काम लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी केले. लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा राजकीय वारसदार म्हणून सांगताना नेहमीच अभिमान वाटतो. राज्य शासनाच्या विविध योजनांमधून मतदार संघातील डोंगरी व दुर्गम भागातील गावांतील विविध विकास कामांना निधी मंजूर करण्याचा लोकप्रतिनिधी म्हणून नेहमीच माझा प्रयत्न राहिला असल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
मरळी (ता. पाटण) येथे लोकनेते बाळासाहेब देसाई भवन ग्रामपंचायत कार्यालय व शेतकरी कृषी प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीच्या लोकार्पण सोहळयाप्रसंगी बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बशीर खोंदू, विजय शिंदे, विष्णू पवार, चंद्रकांत देसाई, सरपंच राजेंद्र माळी, उपसरपंच विनोद कदम, भरत साळूंखे, लक्ष्मण पवार, दिलीप कदम, माजी सरपंच प्रविण पाटील, साईनाथ सुतार, सुनील पाटील, सुनील साळूंखे, संग्राम पाटील, आनंदराव पाटील, संतोष पाटसुते, विजय लोकरे, शिवाजी साळूंखे, गजानन पाटील, अरुण पवार, प्रशांत मोहिते, प्रमोद मोहिते, अक्षय मोहिते, आण्णा कदम, दत्तात्रय कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता सावंत, जिल्हा परिषदेचे संदिप पाटील, कृषी विभागाचे माळवे यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जालिंदर पाटील यांनी केले. सूत्रसंचालन चंद्रकांत कांबळे यांनी केले. संतोष गिरी यांनी आभार मानले.
मरळी हे गाव पहिल्यापासून सत्ता असो अथवा नसो एकसंघपणे कायम देसाई परिवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. पडत्या काळातही आपल्या गावाची एकजूट राहिली असल्याने आता आपण सत्तेच्या माध्यमातून गावातील विकास कामे मार्गी लावत आहोत. राज्य शासनाच्या वेगवेगळ्या योजनांमधून भरघोस निधी मंजूर करण्यासाठी सदैव सहकार्य राहिल. आज विकास कामांच्या प्रवाहामध्ये डोंगरी व दुर्गम भागातील अनेक गावे सामिल होत आहेत. आपल्या मरळी गावाचा सर्वांगीण विकासासाठी या पुढील काळातही आपल्या मरळी गावाने अशीच एकजूट कायम ठेवावी आणि मरळी गावाची एकजूट ही निश्‍चितच इतर गावांना आदर्श ठरेल, असेही यावेळी मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.

COMMENTS