Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

व्हिडिओ काढत असल्याचा संशयावरून सिमेंट ब्लॉक डोक्यात मारून खून 

तिघे ताब्यात दोन पसार

अहमदनगर : नगर मनमाड रोडवरील नागापूर येथील सह्याद्री चौकाजवळ हिरामोती पान सेंटर समोर मृतावस्थेत आढळून आलेल्या इसमाचा खून झाला असल्याचे तपासात निष्

दांडिया खेळायला गेलेल्या तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या
कला केंद्रातील नर्तिकेचा लॉजवर खून करून प्रेताची विल्हेवाट !
यवतमाळमध्ये दोघांची निर्घृण हत्या

अहमदनगर : नगर मनमाड रोडवरील नागापूर येथील सह्याद्री चौकाजवळ हिरामोती पान सेंटर समोर मृतावस्थेत आढळून आलेल्या इसमाचा खून झाला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी दोन विधी संघर्षग्रस्त बालकांसह तिघांना ताब्यात घेतले.  या बाबतची माहिती अशी की मनमाड रोडवरील नागापूर येथील सह्याद्री चौकाजवळ हिरा मोती पान सेंटर समोर दिनांक ४ रोजी रात्री दीड वाजता एक इसम मृत अवस्थेत असल्याची माहिती मिळाली. एमआयडीसी पोलिसांनी त्या अनोळखी इसमास उपचाराकरिता सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी तो इसम उपचारापूर्वीच मयत झाला असल्याचे घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सीआरपीसी 174 प्रमाणे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान मृत व्यक्तीची ओळख पटली असून त्याचे नाव स्टीफन अविनाश मीरपगार ( वय 33 राहणार आंधळे चौरे कॉलनी नवनागापूर अहमदनगर ) असे असल्याचे समजले. 

या घटनेचा एमआयडीसी पोलिसांनी अधिक सखोल व बारकाईने तपास केला असता घटना परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषण, साक्षीदार व गुप्त बातमीदार यांच्याकडे तपास करण्यात आला असता असे निष्पन्न झाले की यातील मयत व त्याची पत्नी हे व्हिडिओ कॉल करून बोलत असताना आरोपी यांना संशय आला की मयत हा आपली व्हिडिओ शूटिंग करीत आहे याचा मनात राग धरून आरोपी यांनी तू आमचा व्हिडिओ का काढतोस असे त्यास शिवीगाळ व दमदाटी करून मयत यास सिमेंटचा ब्लॉक डोक्यात मारून जिवंत ठार मारले. यावरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कायदा कलम 302, 504, 506, 143, 147, 148, 149  प्रमाणे पाच आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

गुन्ह्याचा तपास सुरू असताना एमआयडीसी पोलिसांनी तिघांआरोपींना ताब्यात घेतले. त्यातील दोन विधी संघर्षग्रस्त बालकाना बाल न्यायमंडळ यांचे समक्ष हजर केले. अटक आरोपी संग्राम सोन्याबापु कदम (वय 19 राहणार विठ्ठल रुक्मिणी मंदिरा शेजारी नागापूर एमआयडीसी अहमदनगर) यास न्यायालयासमोर हजर केले. या गुन्ह्यातील किरण बाळासाहेब गव्हाणे (राहणार शनिशिंगणापूर तालुका नेवासा अहमदनगर) आणि सोन्या उर्फ गौतम भगवान अंभोरे (राहणार शनिशिंगणापूर तालुका नेवासा अहमदनगर) हे दोघे पसार झालेले असून एमआयडीसी पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहे.

COMMENTS