Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

योगेश पवार याचा खून; तिघांना अटक

म्हसवड / वार्ताहर : गोंदवले (ता. माण) गावातील योगेश सुरेश पवार याच्या प्रेम कहाणीचा शेवट दुर्दैवी ठरला. रोशनी माने हीच्याशी असलेल्या नात्या

देशभर केंद्रीय तपास यंत्रणेचा द्वेषापोटी वापर : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
देयके प्रमाणक नमुन्यासह देयकांवर नगराध्यक्षांच्या बेकायदेशीररीत्या स्वाक्षरी; विरोधी पक्षनेत्या दीपाली शेळके यांची जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार
वाळवा-शिराळा विधानसभा मतदारसंघ विधान परिषदेपासून वंचित

म्हसवड / वार्ताहर : गोंदवले (ता. माण) गावातील योगेश सुरेश पवार याच्या प्रेम कहाणीचा शेवट दुर्दैवी ठरला. रोशनी माने हीच्याशी असलेल्या नात्यानेच त्याचा घात केला. सपोनि दत्तात्रय दराडे यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांनी अथक प्रयत्नांनंतर संशयित आरोपींना जेरबंद केले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, 20 मार्च 2025 रोजी योगेश पवार बेपत्ता असल्याची नोंद झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. प्रारंभी कोणतेही ठोस धागेदोरे हाती लागत नव्हते. मात्र, तांत्रिक विश्‍लेषणाच्या आधारे योगेश शेवटचे नरवणे येथे गेल्याचे समोर आले. तिथे गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना योगेश याचे एका माहेरवाशिणीसोबत प्रेमसंबंध असल्याचे समजले.
योगेश याच्या बेपत्त्यानंतर संबंधित महिलेला तिच्या घरी विचारणा करण्यात आली, पण ती तिथे नव्हती. पुढील तपासात प्रथमेश आणि अकील विश्‍वकर्मा या दोघांना बारामतीहून अटक करण्यात आली. चौकशीत त्यांनी लोखंडी गजाने मारून योगेश याचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर नरवणे गावातील रोशनी माने आणि तिची आई पार्वती माने यांना मुंबईहून ताब्यात घेतले.
संशयितांकडून मिळालेल्या माहितीवरून हा खून आधीपासून नियोजित असल्याचे उघड झाले. योगेश याला मारल्यानंतर त्याचा मृतदेह स्विफ्ट कारमध्ये टाकून ती कार नातेपुते येथील पाण्याच्या कॅनॉलमध्ये बुडवण्यात आली. पोलिसांनी शोध मोहिम राबवून क्रेनच्या मदतीने गाडी आणि मृतदेह बाहेर काढला. योगेश याच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार सात जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित तिघांचा शोध सुरू आहे. हा संपूर्ण तपास वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दत्तात्रय दराडे करत आहेत.

COMMENTS