मुंबई : मुंबईमध्ये एकाच कुटुंबातील आईसह दोन मुलींची हत्या केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या तिघांची हत्या करून आरोपीने स्वतः
मुंबई : मुंबईमध्ये एकाच कुटुंबातील आईसह दोन मुलींची हत्या केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या तिघांची हत्या करून आरोपीने स्वतःही आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. हा प्रकार प्रेमप्रकरणातून घडल्याचे स्पष्ट झाले असून, मुंबईतील कांदिवली भागात ही घटना घडली.
शिवदयाळ सेन या व्यक्तीने तिघा महिलांची चाकून भोसकून हत्या केली. त्यानंतर स्वतःही आत्महत्या करत जीव दिला. कांदिवली स्टेशन जवळ असलेल्या एका इमारतीत चार मृतदेह आढळून आले होते. छिन्नविछिन्न आणि जखमी अवस्थेतील हे मृतदेह पाहून सगळेच हादरले होते. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी तपास केल्यानंतर प्रेमप्रकरणातून हे हत्याकांड झाले असल्याचे उघड झाले. आत्महत्या करणारा हा एक ड्रायव्हर होता. तर तिघा महिलांची हत्या करण्यात आली होती. यातील एक आई असून इतर दोघीजणी तिच्या मुली होत्या, अशी माहिती समोर आली आहे. किरण दळवी, मुस्काळ दळवी, भूमी दळवी, अशी हत्या करण्यात आलेल्या तिघींची नावे आहेत. तर शिवदयाळ सेन यानं या तिघांचा आधी खून केला आणि त्यानंतर स्वतः आत्महत्या केली. धारदार शस्त्राने वार करुन शिवदयाळ सेन याने तिघींनी संपवलंय. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास केला जातोय. शिवदयाळ सेन हा पेशाने ड्रायव्हर होता. त्याचं तिघांपैकी एकीसोबत प्रेमसंबंध होते. ड्रायव्हरसोबतच्या प्रेमसंबंधाची माहितीत कुटुंबाला कळली. त्यातून सतत खटके उडत होते. अखेर या वादाला कंटाळून ड्रायव्हरने तिघींची हत्या केली, आणि नंतर गळफास घेत स्वतःही जीव दिला. या हत्येप्रकरणी पोलिसांनी सुसाईड नोटही सापडली. तसंच एक धारदार शस्त्रही पोलिसांनी मृतदेह साडलेल्या ठिकाणावरुन जप्त केले. या घटनेनंतर आजूबाजूच्या परिसरात खळबळ माजली होती. पोलिसांनी याप्रकरणी माहिती मिळतचा घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. शताब्दी रुग्णालयाकडून आता या मृतदेहांचे पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट येण्याची पोलिसांना प्रतीक्षा आहे. त्यानंतर अनेक गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
COMMENTS