Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पालघरमध्ये लिव्ह-इन-पार्टनरची हत्या

मृतदेह मृतदेह सुटकेसमध्ये भरून डोंगरावरून फेकला

पालघर/प्रतिनिधी ः पालघरमध्ये 28 वर्षीय लिव्ह-इन पार्टनरच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोप

राजकीय वैमनस्यातून नराधमांनी आख्ख्या कुटुंबाला संपवलं  
छ.संभाजीनगरमध्ये सैराटची पुनरावृत्ती
सोलापुरात पोलिस उपनिरीक्षकाची हत्या

पालघर/प्रतिनिधी ः पालघरमध्ये 28 वर्षीय लिव्ह-इन पार्टनरच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आधी महिलेला पाण्यात बुडवून मारले. यानंतर मृतदेह सुटकेसमध्ये भरून गुजरातमधील वलसाड येथील खाडीत फेकून दिला. मनोहर शुक्ला असे आरोपीचे नाव असून तो मुंबईत कॉस्च्युम डिझायनर म्हणून काम करतो. मेकअप आर्टिस्ट नयना महतसोबत तो पाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होता. नयना मनोहरवर लग्नासाठी दबाव टाकत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्याने तसे करण्यास नकार दिल्याने तिने मनोहरविरुद्ध पोलिसांत बलात्काराची तक्रार दाखल केली. शुक्लाने केस मागे घेण्यास सांगितले. नयनाने नकार दिल्याने मनोहरने तिची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 9 ते 12 ऑगस्टदरम्यान घडली. 12 ऑगस्ट रोजी नयनाला तिच्या बहिणीने बोलावले होते. अनेक फोन करूनही फोन उचलला गेला नाही, तेव्हा त्यांनी मनोहरला याबाबत विचारणा केली. मनोहरने सांगितले की, नयनाचा फोन खराब झाला आहे. दुसर्‍या दिवशीही जेव्हा बहिणीला नयनाचे सोशल मीडियावर कोणतेही अपडेट दिसले नाही तेव्हा तिला संशय आला. 14 ऑगस्ट रोजी पीडितेच्या बहिणीने नायगाव पोलिसात हरवल्याची तक्रार दाखल केली. एफआयआरनुसार, पीडितेने एकदा तिच्या बहिणीला सांगितले होते की, मनोहर तिला मारेल अशी भीती वाटत होती.

COMMENTS