Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वडी येथील युवकाचा खून; चौघांना अटक; एकजण फरार

औंध / वार्ताहर : वडी, ता. खटाव येथे घरगुती वादातून 24 वर्षीय युवकाचा खून झाल्याची घटना घडली असून या घटनेमुळे औंध, पुसेसावळी परिसरात एकच खळबळ उडाल

कराड शहरात टोळी युध्दातून एकावर खूनी हल्ला
वीजचोरी प्रकरणी दोन वर्षाचा तुरुंगवास; अहमदनगर न्यायालयाचा निकाल
टेंभू उपसा सिंचन प्रकल्प कार्यालयाच्या आवारात रयत क्रांतीचे बेमुदत ठिय्या आंदोलन

औंध / वार्ताहर : वडी, ता. खटाव येथे घरगुती वादातून 24 वर्षीय युवकाचा खून झाल्याची घटना घडली असून या घटनेमुळे औंध, पुसेसावळी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या खून प्रकरणातील चौघांना औंध पोलिसांनी अटक केली असून एकजण फरार आहे.
याबाबत घटनास्थळ व औंध पोलीस स्टेशनमधून मिळालेली अधिक माहिती अशी, वडी येथील पोपट येवले यांची भाची प्रतिक्षा (रा. वडगाव हवेली, ता. कराड) हिचा व वडी येथील विशाल येवले याचा विवाह झाला होता. मात्र, भाची प्रतिक्षा हि विशाल बरोबर नांदत नसल्याने पोपट येवले व विशाल येवले यांच्यामध्ये वारंवार भांडणे होत होती. बुधवारी रात्री आठच्या सुमारास वडी येथे विशाल आपासो येवले (वय 24) व पोपट मोहन येवले (वय 45), मनोज मोहन येवले (वय 36), वंदना पोपट येवले (वय 41), वैशाली मनोज येवले (वय 30) व करण पोपट येवले (वय 19) यांच्यामध्ये जोरदार वाद झाला. या वादाचे पर्यावसन मारामारीत झाले. यावेळी उपस्थितांनी विशाल याला काठी, चाकू व लोखंडी गजाने मारहाण केली. या मारामारीच्या घटनेमध्ये विशाल गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला उपचारासाठी कराड येथे हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मूत्यू झाला. या घटनेची माहिती औंध पोलीस स्टेशनला मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख, पोलीस अधिकारी शितल पालेकर, सपोनि प्रशांत बधे, पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे व पोलीस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणातील संशयित आरोपी पोपट येवले, मनोज येवले, वंदना येवले, वैशाली येवले यांना पोलिसांनी अटक केली. तसेच करण येवले हा संशयित फरार आहे. घटनास्थळी श्‍वान पथकासही पाचारण करण्यात आले होते. या घटनेची फिर्याद कृष्णाबाई दादासो येवले यांनी औंध पोलीस ठाण्यात दिली आहे. सपोनि प्रशांत बधे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी प्रशांत पाटील, कुंडलिक कटरे, महेश जाधव व पोलीस कर्मचारी अधिक तपास करत आहेत.

COMMENTS