Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईमध्ये फ्लॅट दाखवण्याच्या बहाण्याने बोलवून जावयाची हत्या

मुंबई - मुंबईतून ऑनर किलिंगचं मोठं आणि धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. यात एका मुस्लीम कुटुंबाने स्वतःच्या मुलीची आणि हिंदू जावयाची हत्या केली आहे

मोबाईलवर जोरात बोलल्याच्या रागातून एकाचा खून
बारामतीमध्ये कोयता व कुर्‍हाडीने विद्यार्थ्याची हत्या
बेंगळुरू टेक फर्मच्या सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालकाची माजी कर्मचाऱ्याकडून हत्या

मुंबई – मुंबईतून ऑनर किलिंगचं मोठं आणि धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. यात एका मुस्लीम कुटुंबाने स्वतःच्या मुलीची आणि हिंदू जावयाची हत्या केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे. आरोपी गोरा खानने त्याचा मुलगा आणि साथीदारांसोबत मिळून आपली मुलगी गुलनाज खान आणि तिचा हिंदू पती करण चंद्र यांची हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. नागराज मंजुळे यांच्या सैराट सिनेमाची आठवण करून देणारी ही धक्कादायक घटना मुंबईमध्ये घडली आहे. करण आणि गुलनाज यांनी उत्तर प्रदेशमध्ये लग्न केलं होतं आणि नंतर ते मुंबईत आले होते. आरोपी गोरा खान याने आपल्या जावयाला मुंबईतील आपलं नवीन घर दाखविण्याच्या बहाण्याने गोवंडी परिसरात बोलावलं. यानंतर जावयाला निर्जनस्थळी नेलं आणि त्याची हत्या करून मृतदेह विहिरीत फेकून दिला

COMMENTS