शेतीच्या वाटपातून वृद्धाचा गळा दाबून खून

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतीच्या वाटपातून वृद्धाचा गळा दाबून खून

अहमदनगर/प्रतिनिधी : श्रीगोंदा तालुक्यातील वाघेर खेडलवाडीदरा, कोळगाव येथे असलेली शेती गट नं. 334 येथे राहात असलेले वृद्ध शेतकरी उपरलाल मुकिंद काळे (वय

अण्णा भाऊंचे साहित्य म्हणजे मराठी भाषेचे वैभव
विवाहितेचा विनयभंग करणे आले अंगलट
वेळीच आरक्षण न दिल्यास राज्यभर आंदोलने करु

अहमदनगर/प्रतिनिधी : श्रीगोंदा तालुक्यातील वाघेर खेडलवाडीदरा, कोळगाव येथे असलेली शेती गट नं. 334 येथे राहात असलेले वृद्ध शेतकरी उपरलाल मुकिंद काळे (वय 65) यांच्या पत्नी सौ. खुराणीबाई उपरलाल काळे(वय 55) हे दोघे त्यांच्या घरी असताना तेथे येवून भाऊबंदांनी बेकायदेशीर जमाव जमवून वृद्ध जोडप्याला शिवीगाळ करीत तुम्ही गावात राहायचे नाही, असे म्हणून शेतीच्या वादावरून भांडण करून जितेंद्र काळे याने उपरलाल काळे या वृद्धाचा गळा दाबून लाथाबुक्क्यांनी वेदम मारहाण केली. त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करीत घरातील सामानाची नासधूस केली. गंभीर जखमी उपरलाल काळे यांना पुणे येथील ससून रुगणालयात उपचारासाठी दाखल केले असता दि.8 मे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी उपरलाल यांचा मुलगा विशाल काळे यांनी पोलिसात फिर्याद दिल्यावरून फुलचंद मुकिंदा काळे, निलेश काळे, मीना मुकुंदा काळे, परवेश मिनास काळे (सर्व रा. वाघेरखेडलवाडी दरा) व पिंटया भोसले, संजय भोसले (दोघे रा. खरातवाडी, श्रीगोंदा) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा बेलवंडी पोलिस कसून शोध घेत आहेत.

COMMENTS