Homeताज्या बातम्यामनोरंजन

मुन्नाभाई आणि सर्किट १३ वर्षानंतर येणार एकत्र

अभिनेता संजय दत्त आणि अर्शद वारसी यांची धमाकेदार जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. राजकुमार हिरानी यांच्या ‘मुन्ना भाई एम्. बी

टपाल खात्यामार्फत सूर्यघर योजनेचे सर्वेक्षण सुरु
‘जिगोलो’ चे काम देण्याचे आमीष दाखवून 350 तरुणांची फसवणूक
जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

अभिनेता संजय दत्त आणि अर्शद वारसी यांची धमाकेदार जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. राजकुमार हिरानी यांच्या ‘मुन्ना भाई एम्. बी. बी. एस्’ या चित्रपटातील सर्किट आणि मुन्नाची जोडी फार प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर ‘लगे रहो मुन्ना भाई’ या चित्रपटात त्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातला. तेव्हा पासूनच संजय दत्त आणि अर्शद वारसी यांना पुन्हा एकदा एकत्र कधी पाहता येईल याबाबत प्रेक्षक उत्सुक होते. या जोडीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे लवकरच ही जोडी पुन्हा एकत्र येणार आहे. मात्र यावेळी ते कुठल्याही ‘मुन्ना भाई’च्या सिक्वलसाठी एकत्र येत नसून एका नवीन चित्रपटात झळकणार आहेत. सर्किट आणि मुन्ना कुठल्या चित्रपटात पुन्हा एकत्र येणार?

अर्शद वारसी याने त्याचा आगमी चित्रपट च्या प्रमोशनवेळी याबाबत माहिती दिली. “संजू आणि मी पुढीलवर्षी येणाऱ्या एका चित्रपटात एकत्र काम करणार आहोत. प्रसिद्ध दिग्दर्शक साजिद-फरहाद या चित्रपटाचे दिग्दर्शक करणार आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. परंतु या चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित केलेली नाही.” अशी माहिती अर्शदने दिली. कथानक काय असेल? या चित्रपटाच्या कथेबद्दल सांगताना अर्शद असे म्हणाला की, “आमच्या पुढच्या चित्रपटात संजू एका अंध डॉनची भूमिका साकारत आहे. आणि त्याचा सहकारी आहे. विशेष म्हणजे संजूच्या अंधपणाबद्दल केवळ मलाच माहिती आहे. संपूर्ण चित्रपटात संजू माझ्या डोळ्यांनी जग पाहताना दिसेल. या चित्रपटाच्या पहिल्या भागासाठी आम्ही लवकरच युरोपमधील बुडापेस्ट येथे जाणार आहोत.” अर्शदने केलेल्या या नव्या घोषणेनंतर आता चाहते सर्किट आणि मुन्नाची धमाल पुन्हा एकदा पाहाण्यासाठी उत्सुक आहेत.

COMMENTS