“पाऊस किती पडावा हे महानगरपालिका ठरवत नाही”

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

“पाऊस किती पडावा हे महानगरपालिका ठरवत नाही”

अमृता फडणवीसांवरही अयोध्या पौळ यांनी साधला निशाणा

मुंबई प्रतिनिधी  - अयोध्या पौळ(Ayodhya Paul) यांनी देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. पावसाबाबत फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यावर अयोध्या यांनी टीक

मला तडीपार करण्याचा फडणवीसांचा डाव
उद्धव ठाकरेंना मानसोपचारांची गरज
‘किशोर’ दिवाळी अंकाचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई प्रतिनिधी  – अयोध्या पौळ(Ayodhya Paul) यांनी देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. पावसाबाबत फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यावर अयोध्या यांनी टीका केली आहे. पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ झाली नाही हे क्रेडीट आदित्य ठाकरेंचं असल्याचं पौळ म्हणाल्या. पुण्यात सोमवारी पावसाने ठिकठिकाणी पाणी तुंबलं. अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरात, दुकानांमध्ये पाणी घुसून प्रचंड नुकसान झालं. वाहनांमध्ये पाणी शिरल्याने वाहनांचंही नुकसान झालं. त्यामुळे महानगरपालिकेत सत्ता असणाऱ्या भाजपावर जोरदार टीका होतेय. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी “पाऊस किती पडावा हे महानगरपालिका ठरवत नाही,” अशी प्रतिक्रिया दिली होती. फडणवीसांच्या याच प्रतिक्रियेवर फडणवीसांनी निशाणा साधला. तसेच अमृता फडणवीसांवरही अयोध्या पौळ यांनी निशाणा साधला.

COMMENTS