देवळाली प्रवरा /प्रतिनिधी ः देवळाली प्रवरा शहरात विविध ठिकाणी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. जिल्हा परीषद मराठी शाळा व उर्दु शाळेत संयुक्त स्

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी ः देवळाली प्रवरा शहरात विविध ठिकाणी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. जिल्हा परीषद मराठी शाळा व उर्दु शाळेत संयुक्त स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला. माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने मराठी व उर्दु शाळेतील एका शिक्षकांसह नगर पालिकेच्या एका कामगाराचा 26 जानेवारी पासुन आगळ्या वेगळ्या पद्धतीने सन्मान करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पञकार राजेंद्र उंडे यांच्या अध्यक्षतेखाली विविध सांस्कृतिक कार्यक्रम व विद्यार्थ्यांचे भाषणे झाली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्षा शोभा मोरे,माजी अध्यक्ष सुनिल शेटे,अमोल भांगरे, प्रमोद गाढे, सुनिल कांबळे, मुख्याध्यापक मंगल पठारे,उर्दुचे मुख्याध्यापक इमाम अब्दुल रहमान सय्यद आदी उपस्थित होते.पालकांनी सांस्कृतिक कार्यक्रमात रोख बक्षिसे देवून विद्यार्थ्यांचा गौरव केला.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पञकार राजेंद्र उंडे यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, जिल्हा परीषदेची शाळा म्हटले की पालकवर्ग दुर्लक्ष करतात. परंतू या मराठी व उर्दु शाळेतील शिक्षकांना खरोखर धन्यवाद द्यावे लागतील. येथिल विद्यार्थी इंग्रजी माध्यमापेक्षाही चांगल्या दर्जाची इंग्रजी मधुन भाषणे केल्याने पालकवर्गातून समाधान व्यक्त केले. शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने मराठी व उर्दु शाळेसह नगर पालिकेच्या एका कामगाराचा 26 जानेवारी पासुन आगळ्या वेगळ्या पद्धतीने सन्मान करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली
COMMENTS