महापालिकेने केला डॉक्टरांचा सन्मान ; मनपा आरोग्य समितीचा पुढाकार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महापालिकेने केला डॉक्टरांचा सन्मान ; मनपा आरोग्य समितीचा पुढाकार

अहमदनगर/प्रतिनिधी : ’डॉक्टर डे’निमित्त शहरातील डॉक्टरांचा मनपा आरोग्य समिती व आरोग्य विभागाच्यावतीने सन्मान करण्यात आला. नगर शहर व जिल्ह्यातील डॉक्टर

अपयशातून यशाचा मार्ग तयार करा ः आमदार आशुतोष काळे
माजी आमदार पिचड यांच्यामुळे धान खरेदी केंद्र सुरू
स्वस्तातील साखरेचा मोह पडला महागात, अडीच लाख लुटले

अहमदनगर/प्रतिनिधी : ’डॉक्टर डे’निमित्त शहरातील डॉक्टरांचा मनपा आरोग्य समिती व आरोग्य विभागाच्यावतीने सन्मान करण्यात आला. नगर शहर व जिल्ह्यातील डॉक्टरांनी कोविड काळात आरोग्य सेवेत केलेले काम कौतुकास्पद असल्याचे गौरवोदगार उपमहापौर गणेश भोसले यांनी यावेळी व्यक्त केले. यानिमित्ताने वीस वर्षात प्रथमच मनपाच्यावतीने डॉक्टरांचा गुणगौरव करण्यात आला.
या कार्यक्रमात आय.एम.ए चे अध्यक्ष डॉ.अनिल आठरे, डॉ. एस.एस.दीपक, डॉ.गोपाळ बहुरूपी, डॉ.सचिन पांडुळे, डॉ.सचिन वहाडणे, डॉ. आशिष भंडारी, डॉ.पियुष मराठे, डॉ.सोमीनाथ गोपाळघरे, डॉ. मंदार भणगे, डॉ.पियुष पाटील, डॉ.एस. वी. चेलवा, डॉ. प्राजक्ता पारदे, डॉ.आरती ढापसे, डॉ.आयेषा शेख, डॉ. नलिनी थोरात, डॉ. अशना सय्यद, डॉ. ईश्‍वर फणसे, डॉ. संतोष गांगर्डे यांचा उपमहापौर भोसले व मनपा आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ. सागर बोरुडे यांनी सन्मान केला. यावेळी मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त श्रीनिवास कुरे, माजी नगरसेवक सचिन जाधव, आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे उपस्थित होते. बुरुडगाव रोड येथे मनपाच्या मालकीचे सुसज्ज हॉस्पिटल उभे राहत असल्याने या हॉस्पिटलच्या उभारणीसाठी व नगरकरांना मोफत उत्तम आरोग्यसेवा उपलब्ध होण्यासाठी शहरातील डॉक्टरांनी सूचना कराव्यात, असे आवाहन भोसले यांनी यावेळी केले.

COMMENTS