बाजारपेठेच्या दुरवस्थेला मनपा आयुक्त व जिल्हाधिकारी जबाबदार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाजारपेठेच्या दुरवस्थेला मनपा आयुक्त व जिल्हाधिकारी जबाबदार

नागरीक कृती मंचाची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

अहमदनगर/प्रतिनिधी : नगरच्या कापड बाजार, घासगल्ली व परिसरातील बाजारपेठेत हॉकर्स व हातगाडीवाल्यांची वाढती अतिक्रमणे रोखण्यात अपयश येत असल्याने बाजारपेठ

आमदार काळेंच्या निधीतून 84 लाखांच्या कामांना मान्यता
वादळात उडाले शाळेचे पञे
केडगाव परिसरात दहशत माजवणारा आरोपी जेरबंद l पहा LokNews24

अहमदनगर/प्रतिनिधी : नगरच्या कापड बाजार, घासगल्ली व परिसरातील बाजारपेठेत हॉकर्स व हातगाडीवाल्यांची वाढती अतिक्रमणे रोखण्यात अपयश येत असल्याने बाजारपेठेच्या झालेल्या दुरवस्थेला जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त जबाबदार आहेत, अशी तक्रार येथील नागरिक कृती समितीचे अध्यक्ष शशिकांत चंगेडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. दरम्यान, बाजारपेठेत विविध साहित्य खरेदीसाठी येणार्‍या महिलांनी हातगाडीवाले वा पथारीवाल्यांकडून माल विकत घेतला नाही तर या महिलांबाबत फार वाईट कॉमेंटस हॉकर्सकडून केल्या जातात तसेच पर्स वा मोबाईल चोरीच्या फिर्यादी कोतवाली पोलिस ठाण्यात घेतल्या जात नसल्याने नागरिक अशाने परत बाजारपेठेत येतील का?, असा सवालही चंगेडे यांनी केला आहे.
अहमदनगर महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या कामकाजबाबत गंभीरपणे तक्रार दाखल करण्यात येत आहे, असे मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद करून चंगेडे यांनी म्हटले आहे की, अहमदनगर शहर अनेक वर्षापासून दंगलमुक्त झाले आहे. पण या मुख्य बाजारपेठेमधील अतिक्रमणधारक हे महापालिकेकडील अतिक्रमण निर्मूलन मोहिमेच्या वरिष्ठ अधिकारी, पोलिस वाहतूक शाखा व संबंधित कोतवाली पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी हे दबावाखाली काम करतात का? गेली 25 वर्ष व्यपारी अतिक्रमणामुळे रोज धमक्यांना सामोरे जात आहे. दोन-चार दिवसात दुकानदारांना मारहाण होते, दुकानांपुढे हातगाडी व हँगर लावलेले जातात, 50 फुटी रोड पायी चालणेलायक राहात नाही व त्यात महिलांनी त्यांच्याकडून माल घेतला नाही तर फार वाईट कॅमेट केली जाते, पर्स-मोबाईल चोरीची पोलिस ठाण्यात फिर्याद घेत नाही. अशाने नागरिक परत बाजारपेठेत येतील का? असा सवाल करूनस जिल्हाधिकारी व आयुक्त यांचे कामकाज बेजबाबदारपणामुळे हे होत आहे, त्यामुळे त्यांच्याविषयी तक्रार आहे, असे चंगेडे यांनी स्पष्ट केले आहे.

शहरातील वातावरण दूषित
जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांच्याकडून बेजबाबदारपणा परिस्थितीचे परिणाम होतील, याची जाणीव नाही. शहरातील वातावरण दूषित झाले आहे व त्यांची भूमिका ही वरिष्ठ अधिकारी म्हणून योग्य नाही ते आपणही जाणता, असे मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद करून चंगेडे यांनी पुढे म्हटले आहे की, शासकीय निर्णयानुसार वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांचा खुलासा हे दोघे अधिकारी देत नाही. मनपाचा प्रसिद्धी विभाग फक्त पाणी सुटणार की नाही याचीच फक्त प्रेस नोट रिलीज करतात. शहरातील 21 ओढे-नाले यांचे नैसर्गिक प्रवाह बंदीस्त केले आहे व बांधकाम आराखडे मंजूर करण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या आधारे 15 मे पर्यंत फक्त बिले काढली जातात, जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या व निवासी उपजिल्हाधिकारी सदस्य सचिव व पालिका आयुक्त सदस्य असल्याने शहरातील आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या आधारे कामकाज पाहणी दौरे व तपासणी करून खात्री करून घेतली पाहिजे. पण ते होत नाही व उपनगरात पावसाळ्यात पाण्याचा प्रताप दर वर्षीचा झाला आहे. आपण पक्षाचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी आहात, त्यामुळे या गंभीर बाबींवर गंभीरपणे विचार व कृती करण्याची गरज व तातडीने कारवाई करण्यात आली पाहिजे, अशी मागणीही चंगेडे यांनी या पत्रात केली आहे.

COMMENTS