Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यक्रमाला मुंडे भगिनी गैरहजर

बीड/प्रतिनिधी ः गेल्या काही दिवसांपासून बीडमधील राजकारण केंद्रीत होतांना दिसून येत आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांचे पुनर्वसन

राम मंदिराच्या पुजारी पदासाठी 200 जणांची निवड
Lonand : साखरवाडी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मुजोरीपणा
ज‍िल्हाध‍िकाऱ्यांची पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांच्या ‘बीज बँके’ला भेट

बीड/प्रतिनिधी ः गेल्या काही दिवसांपासून बीडमधील राजकारण केंद्रीत होतांना दिसून येत आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांचे पुनर्वसन होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र पंकजा मुंडे यांना मंत्रिपद तर, सोडा साधी विधानपरिषदेची आमदारकी देखील देण्यात आलेली नाही. तसेच याप्रकरणी अनेकवेळेस पंकजा आणि प्रीतम मुंडे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच रविवारी बीड जिल्ह्यातील गहीनाथ गडावरील संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. परंतु, या कार्यक्रमाला भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे उपस्थित नव्हत्या. मुंडे भगिणींच्या गैरहजेरीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

 यंदा प्रितम मुंडे आणि पंकजा मुंडे यांनीही सोहळ्याला हजेरी लावली नाही. गहिनीनाथ गडावर येणारी भक्त मंडळी पंकजा मुंडे समर्थक सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे किंवा प्रितम मुंडे या व्यासपीठावर नसणार आहेत हे समजल्यानंतर अनेक भाविकांनी देखील देवेंद्र फडणवीस यांचे भाषण होण्याआधीच गड सोडला. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांच्या ओरंगाबाद येथील सभेला देखील पंकजा मुंडे यांना आमंत्रण देण्यात आले नव्हते. तरी देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या. परंतु, आवघ्या एका मिनिटात आपले भाषण त्यांनी आवरले होते. तेव्हा देखील त्यांची नाराजी असल्याचे बोलले जात होते. रविवारी देखील देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला त्या उपस्थित नव्हत्या. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे.

पंकजा मुंडे यांच्या रक्तात भाजप – बावनकुळे पंकजा मुंडे यांना ठाकरे गटाची ऑफर आहे यावर बोलतांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, पंकजा मुंडे यांच्या रक्तात भाजप आहे. त्या कधीच जाऊ शकत नाहीत. ठाकरे गटाला त्यांचा पक्ष सांभळता येत नाहीत त्यामुळे ते अशा चर्चा करतात. त्यांचा पक्ष त्यांनी सांभाळला पाहीजे. पंकजा मुंडे यांच्या बद्दल त्यांनी अफवा पसरवू नये. पंकजा मुंडे यांना कोणीही फूस लावू शकत नाही ऐवढ्या त्या प्रगल्भ नेत्या आहेत. गोपीनाथ मुंडे यांचा आदर्श त्यांच्यावर आहे.

COMMENTS