मुंबई : मुंबईतून मान्सून दाखल होऊन आठवडा उलटून गेला तरीही मुंबई आणि परिसराला जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. कारण मुंबईत एकूण पाणीपुरवठा करणार्या

मुंबई : मुंबईतून मान्सून दाखल होऊन आठवडा उलटून गेला तरीही मुंबई आणि परिसराला जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. कारण मुंबईत एकूण पाणीपुरवठा करणार्या सात जलाशयांमध्ये 5.38 टक्के इतकाच पाणीसाठा आहे. येत्या काही दिवसांत सातही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला नाही तर मुंबईवरील पाणीकपातीचे संकट आणखी गडद होण्याची भीती आहे.1 जूनपासून मुंबईत 10 टक्के पाणीकपात सुरुच आहे.
मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी आणि राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा, भातसा या सात तलावांतून मुंबईला पाणीपुरवठा होतो. या तलावांची पाणी साठवणक्षमता 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर आहे. या तलावांतून दररोज पाणीपुरवठा विविध जलवाहिन्यांद्वारे करण्यात येतो. पावसाची हुलकावणी, वाढलेला उष्मा आणि पाण्याची मागणी आणि तलावांतील पाण्याचे मोठ्या प्रमाणात होणारे बाष्पीभवन यांमुळे तलावांतील पाण्याची पातळी घटली आहे. सध्या मुंबईला 20 ते 22 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. मुंबईत पाणी संकट अधिक गडद होण्याची शक्यता अप्पर वैतरणा आणि भातसा जलाशयात शून्य टक्के पाणीसाठा आहे. सोमवारी जलाशयात म्हणून एकूण 77851 दशलक्ष लिटर इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. दररोज 3800 दशलक्ष लीटर एवढा पाणीपुरवठा होतो. यामध्ये दहा ते पंधरा टक्के पाणी कपात सध्या करण्यात आली आहे. दरम्यान, राज्यात ऊन-पावसाचा खेळ पाहायला मिळत आहे. काही भागात जोरदार पाऊस सुरु आहे, तर काही भागात पावसाने गेल्या काही दिवसांपासून दांडी मारली आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना कोसळधारेने भिजवणारा पाऊस आता गायब झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज आहे. साधारणपणे ढगाळ आकाश आणि शहर आणि उपनगरात मघेगर्नजसेह हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
21 जूननंतरच पावसाचा जोर वाढणार – भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात सध्या कमकुवत मान्सून पाहायला मिळत आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, 20 जूननंतर मान्सूनचे वारे अधिक बळकट होण्याची शक्यता असून यानंतर राज्यात मान्सूनचा जोर वाढण्याची शक्यता आहे. ताज्या हवामान अपडेटनुसार, येत्या आठवड्यात किमान घाट भागात आणि धरणाच्या पाणलोटांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 19 ते 20 जूननंतर मान्सूनसाठी अनुकूल वातावरण निर्माण होणार असून त्यानंतर 21 जूनपासून महाराष्ट्रात जोरदार मान्सून पाहायला मिळेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
COMMENTS